साऊथ इंडस्ट्रीमध्ये माजली खळबळ!!! विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या सेटवर झाला अपघात; अपघातात विजय सेतूपतीचा…

प्रेक्षकांमध्ये ॲक्शन चित्रपट पाहण्याची जास्त क्रेझ पहिला मिळते. हॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात चित्रपटांमध्ये ऍक्शन पहिला मिळते. परंतु असे ॲक्शन चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना अनेक छोट्या मोठ्या अपघातांना सामोरी जावे लागते. (In South industry Stuntman S Suresh dies during film shoot of actor Vijay Sethupathi)

साऊथ इंडस्ट्री मधून ॲक्शन चित्रपट चित्रीकरणाच्या दरम्यान अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये ५४ वर्षीय स्टंट मॅनचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्टंट मॅन एस सुरेश असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे सेटवरील सर्वानांच मोठा धक्का बसला आहे.

विदुथलाई या चित्रपटाच्या शूटिंग वेळी ही धक्कादायक घटना घडली आहे. दिग्दर्शक वेत्रीमारन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते.  मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत सुरेश असिस्टंट म्हणून काम करत होते. या चित्रपटासाठी सुरेश यांना जंपिंग स्टंट करायचा होता.

त्यासाठी त्यांना दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधले होते. परंतु स्टंट सुरु झाला आणि ती दोरी तुटली. त्यामुळे सुरेश तब्बल २० फूट उंचीवरून खाली पडले होते. सुरेशच्या खाली पाडल्यानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. परंतु तोपर्यंत त्याच्या मृत्यू झाला होता.

या घटनेने सगळेच खूप हैराण झाले आहेत. सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे  सेटवर शोककळा पसरली होती. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपासून सुरु केला.  या अपघातामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुरेश एक स्टंट मॅन म्हणून तब्बल २५ वर्षा  पासून कार्यरत होते.

Leave a Comment