लाखात एक बुद्धिमान माणूस फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधू शकतो, फोटो Zoom करा उत्तर मिळेल…

इंटरनेटवर सतत ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. ते फोटो डोळ्यांला धोक्का देण्यासाठी तयार केलेले असतात. ऑप्टिकल इल्यूजनचा असाच एक फोटो सध्या  तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमधील लपलेला प्राणी शोधून दाखवायचं चॅलेंज देण्यात आलं आहे. (Find the hidden animal in this viral Optical illusion photo)

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार केलेले असतात. या फोटोंमुळे  आणि कोड्यांमुळे मेंदूचा आणि डोळ्यांचा चांगलाच व्यायाम होतो. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका प्राण्याला शोधायचे आहे.

या फोटोमध्ये दिसत आहे कि, सर्वत्र काळ्या रंगामध्ये पांढऱ्या रेषा आहेत. तर या चित्रामध्ये २ वेगवेगळे प्राणी लपले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे प्राणी शोधणं खूप अवघड काम आहे. या फोटोला पहिल्यानंतर बुद्धी भ्रमित झाल्यासारखे वाटते. त्यामुळे या फोटोमधील प्राणी सहजसहजी दिसणार नाहीत.

फोटोमध्ये अनेक प्रकारच्या पांढऱ्या रंगाच्या रेषा दिल्या गेल्या आहेत. ज्या खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये दिसत आहेत. तर चॅलेंज असं देण्यात आलं आहे कि, या पॅटर्नमध्ये लपलेले दोन प्राणी शोधून दाखवायची आहेत.  ते प्राणी मांजर किंवा उंदीर देखील असू शकतात.

घारे सारख्या तीक्ष्ण नजरेचा वापर केल्यांनतर या फोटोमधील प्राणी दिसतात. परंतु अनेकांना या फोटोमध्ये लपलेली प्राणी सापडली नाहीत.  टॉम हिक्स नावाच्या युजरने हा फोटो सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचसोबत त्याने लिहले कि, या फोटोमध्ये तुम्हाला मांजर किंवा उंदीर दिसत आहे.  हे मात्र तुमच्या बुद्धीच्या कार्यावर आधारित आहे.

गंमत म्हणजे या फोटोत जे दिसतंय ते या फोटोचा भाग नाही तर बुद्धीने रचलेला एक भ्रम आहे. हा फोटो झूम करून पाहिल्यानंतर हे सर्व अदृश्य होऊन जाईल. मानवी बुद्धिमत्तेची चाचणी करण्यासाठी अशे फोटो बनवले जातात.

हे सगळं तुम्ही मेंदूच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कोणता प्राणी पाहता यावर ते अवलंबून आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांना यामध्ये मांजर आणि कोल्हा दिसला आहे. परंतु उंदीर फार कमी लोकांनी पाहिला आहे. तर अनेक लोकांनी अशी देखील तक्रार केली कि यामध्ये कोणताच प्राणी दिसत नाही.

Leave a Comment