नाकावरच्या रागाला औषध काय’ या प्रसिद्ध गाण्यातील बालकलाकार आठवतात का? ३१ वर्षानंतर पहा काय करतात ते….

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ९० चा दशक म्हणजे सुवर्णकाळ होता. त्या काळामध्ये अनेक नायक आले व गेले परंतु  अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी प्रेक्षकांना स्वतः भवती गुरफटून ठेवले होते.  या तिघांनी त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केली आहे.(Do you remember the child actors in the famous song ‘Nakavarchya  Raga La Aavshad  Kaya’? See what they do after 31 years)

१९८९ साली कळत नकळत हा चित्रपट  प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये विक्रम  गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ अश्या उत्कृष्ट कलाकारांनी काम केली होते. या चित्रपटामधील दोन गाणी खूपच प्रसिद्ध झाली होती.

त्यातील एक होत  ‘हे एक रेशमी घरटे’  आणि दुसरे होते ‘नाकावरच्या रागाला औषध काय. त्या गाणयत दोन बालकलाकार पाहायला मिळाले होते.  ‘बच्चू’ आणि ‘छकुली’ ची त्या बालकलाकारांनी भूमिका साकारली होती. जाणून घेऊया या दोघांबद्दल.

ओमेय आंब्रे यांनी बच्चूची भूमिका साकारली होती तर मृण्मयी चांदोरकर हिने छकुलीची भूमिका साकारली होती. परंतु आज ओमेय आंब्रे हा अभिनय क्षेत्रापासून खूप लांब गेला आहे. बीकॉमची पदवी त्याने मुंबईतील आर ए पोदार कॉलेजमधून घेतली होती. त्यांनी लग्न केलं आहे व तो आता दोन मुलांचा वडील आहे. न्यू जर्सी येथे ओमेय त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो.

छकुलीची भूमिका साकारणारी मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. व. पू. काळे हे एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणून देखील ओळखले जातात. वाट एकटीची, ठिकरी, साथी ही पुस्तके त्यांनी लिहलेल्या पुस्तकांपैके आहेत. व. पू. काळे यांची मुलगी स्वाती चांदोरकर देखील एक लोकप्रिय लेखिका आहे. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन  अशी उत्तम पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे मृण्मयी चांदोरकर. कळत नकळत चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून मृण्मयीने काम केलं होत. परंतु पुढे तिने कोणत्याच चित्रपटामध्ये काम केलं नाही. मृण्मयीने देखील लग्न केलं आहे. ती तिच्या घर संसारात रमलेली दिसते. मात्र ती स्टार इंडियाशी निगडित असल्याचे समजले आहे.

Leave a Comment