संगीतकार अशा भोसले यांच्या नातीला पाहिलंत का? अभिनेत्रींनपेक्षाही दिसते खूप सुंदर…

आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतकार म्हणजे आशा भोसले. त्यांचा संगीताचा वारसा पुढे त्यांची नातं चालवताना दिसत आहे.

आशा भोसले यांचा धाकटा लेक आनंद भोसले यांची मुलगी जनाई भोसले तिच्या क्युट चेहऱ्याने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे.

जनाईला “तू लता मंगेशकर हो” असा आशीर्वाद आशा भोसले यांनी दिलेला पाहायला मिळतो. लता दीदींनी जशी सुरेल, मधुर गाणी गायली तशीच गाणी आपल्या नातीने देखील गावित अशी आशा भोसले यांची मनापासून इच्छा होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zanai🦋 (@zanaibhosle)

जनाई भोसले हिने कत्थक नृत्यात विशारद मिळवली आहे. गेल्या काही वर्षांत तिने आशाताईंबरोबर अनेक कार्यक्रमात गाणी गायली आहेत.

जनाईचा आवाज मधुर आहे ती सुरेल गाते हे लक्षात येताच आशाताईंनी तिला शास्त्रीय गायनासाठी प्रोत्साहन दिले.

यशराज फिल्म्सकडून जनाईला पहिल्यादा एका अल्बमसाठी गाणं गाण्याची संधी मिळाली. वयाच्या १४ व्या वर्षी तिने सिक्स पॅक ब्रॅण्डसाठी ‘हिल हिल पोरी हिला..’हे गाणं गायलं.

हे गाणं मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेचं मिश्रण होत. या ब्रॅण्डची स्थापना तृतीयपंथांनी केली होती. आशा भोसले यांच्या नातीने आमच्या ब्रॅण्डसाठी गाणे गायले म्हणून तिने या ब्रँडला एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे यामुळे आमच्या ब्रँडला चक्क अमेरिकेहून विचारणा झाली होती अशी या ब्रॅण्डच्या सदस्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

आशा भोसले यांची नातं म्हणून जनाई नेहमीच चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकची आणि सौंदर्याची चर्चा देखील खूप पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zanai🦋 (@zanaibhosle)

जनाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, गाण्याच्या व्हिडिओ शेअर करत असते.

आशा भोसले आणि लता आज्जी या दोघींचाही सहवास मला लाभला आहे. दोघींचीही गाणी मला खूप आवडतात, असे जनाई म्हणते. आशा भोसलेंच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न जनाई करताना दिसून येते.

Leave a Comment