प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर…

९० च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. याच वेळेस मराठवाड्यातून अनेक कलाकार हे चित्रपटसृष्टी मध्ये काम करण्यासाठी गेले होते. यामध्ये प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, प्रदीप दळवी हे मुख्य होते.

१९९१ मध्ये हे कलाकार मुंबईत आले. त्यानंतर करिअरच्या दृष्टीने  त्यांनी तिथेच आपले वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी मागे  पाहिलेच नाही. प्रतीक्षा लोणकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. त्यांनी काम केलेल्या सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आजवर त्यांनी हिंदी, मराठी आणि इतर भाषांतही चित्रपट मालिका केल्या आहेत.

प्रतीक्षा लोणकर यांची अनुभूती हि मराठी मालिका केली होती. त्यानंतर अन्न हे पूर्णब्रह्म हे मराठी कार्यक्रम केले आहेत. त्यानंतर मराठी नावाचे अर्थ हे नाटकही गाजले. मी सौ कुमुद प्रभाकर आपटे हे नाटक लोकप्रिय ठरले. ऑल द बेस्ट हे हिंदी नाटकही खूप प्रसिद्ध झाले होते.

आशाये, इक्बाल यासारखे हिंदी चित्रपट त्यांचे लोकप्रिय ठरले. एवढेसे आभाळ या चित्रपटातून त्यांना एक वेगळीच प्रेक्षकांच्या मनात भुरळ पडली. कहानी नही जवानी है, हे हिंदी नाटक ही त्यांचं गाजलं होतं. कळत नकळत या नाटकात त्यांनी खूप सुंदर काम केले.

गुडगुडी, खेळ सातबारा, दिनमान दुनिया, दुसरी गोष्ट, जोर, दौलत, नया नुक्कड, पिंपळपान, पुरुष, बंदिनी, बसेरा बिनधास्त, हमारी बहु को भरारी, भेट, मार्शल, मिसेस माधुरी दीक्षित, मीराबाई नॉट आऊट, मुंबई कटिंग, मोकळा श्वास, येळकोट यासारख्या असंख्य मराठी आणि हिंदी सिनेमात त्यांनी काम केले.

मात्र, खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळून दिली ती दामिनी या दूरचित्रवाणी वरील मालिकेने. दूरदर्शनवर ही मालिका काही वर्षांपूर्वी यायची. या मालिकेने त्यांना एक वेगळीच ओळख मिळून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. प्रतीक्षा लोणकर यांचा जन्म 12 जून 1968 मध्ये झाला आहे. त्यांचे वय आता  54 वर्ष आहे.

दामिनी या पहिल्या दैनंदिन मालिकेतून प्रतीक्षा लोणकर यांना प्रसिद्धी मिळाली . या मालिकेत त्यांनी साकारलेल्या तडफदार दामिनीच सगळीकडे खूप फेमस झाली. मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतलेल्या प्रतीक्षा लोणकर यांनी प्रशांत दळवी यांच्याशी लग्न केले आहे. प्रशांत प्रतीक्षा यांना रुंजी नावाची मुलगी आहे.

प्रतीक्षा या सोशल मीडियावरचे फोटो शेअर करत असतात. प्रतीक्षा यांच्यासारखीच सुंदर दिसते. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत प्रतीक्षा यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका ही प्रेक्षकांना खूप आवडली. सध्या त्यांची अबोली ही मालिका रिलीझ होणार असून या मालिकेलाही प्रेक्षकांनी प्रसिद्धी दिली आहे.

प्रतीक्षा यांनी मालिकांसोबतच इकबाल, वॉन्टेड, नन्हे जैसलमेर अशा हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे त्यांच्या अनेक मालिका हिंदी सिनेमा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment