दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पत्नीला पाहिलंत का? कलाविश्वात सक्रिय नसली तरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर…

मराठी अभिनेता सयाजी शिंदेने(Sayaji Shinde) आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. त्यांनी केवळ मराठीत नव्हे तर तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक चित्रपटात काम केले आहे. (Sayaji Shinde’s wife looks very beautiful)

त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच ते सामाजिक कार्यात देखील सहभागी होतात. मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही.

अभिनेते सयाजी शिंदे यांची पत्नी आणि मुले लाइमलाईट पासून लांबच राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे आहे आणि त्या दिसायला खूपच सुंदर आहेत. या दोघांना सिद्धार्थ नावाचा मुलगा आहे.

अलका शिंदे सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्या यावर सतत त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर सयाजी शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

Photo Courtesy: Google/CC

सयाजी शिंदे यांनी मराठी एकांकितेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय, झुलवा या मराठी नाटकातील त्यांचा अभिनय खूपच लोकप्रिय झाला आहे. त्यानंतर त्यांनी अन्य भाषेतदेखील अभिनय केला आहे.

सयाजी शिंदे यांनी अबोली या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी अनेक नाटकात काम केले आहे. सखाराम बाईंडर ही भूमिका त्यांची खूप गाजलेली होती.

तसेच झुलवा, वन रुम किचन, आमच्या या घरात त्यांची नाटके खूप गाजली आहेत. गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटातील त्यांची कृषिमंत्री ही भूमिका खूप प्रसिद्ध झाली. सयाजी शिंदे यांच्या साऊथच्या चित्रपटातील भूमिका खूप गाजल्या होत्या.

Leave a Comment