गोट्या मालिकेतील ‘हा’ बालकलाकार आहेत का लक्षात! ३३ वर्षानंतर त्याला ओळखणंही झालं कठीण…

गोट्या या मालिकेने एकेकाळी सर्वाना वेड लावले होते. मात्र या मालिकेला प्रदर्शित होऊन 33 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र तरी देखील प्रेक्षकांच्या मानत या मालिकेबद्दल आणखीन प्रेम आहे. या मालिकेतील बालकलारांची माहिती आपण आज घेऊयात. (Do you remember these child actors from the Gotya series!! Hard to recognize after 33 years)

गोट्या हि मालिका राजदत्त यांनी बनवली होती. मात्र ते आज या जगात नाहीत. परंतु त्यांच्या अनेक मालिकां आणि चित्रपटांमुळे त्यांची आठवण क्षणोक्षणी येती. या मालिकेत गोट्या काकांची भूमिका सुभाष भालेकर यांनी केली होती. तर ‘सविता मापाळेकर’ हिने गोट्याच्या मावशीची भूमिका केली होती. गोट्याला “भय्या उपासनी” आणि “मानसी मागीकर” यांनी दत्तक घेतले होते.

गोट्याचे खरे मामा म्हणजेच दगडू ट्रक ड्रायव्हर यांची भूमिका अभिनेते “विजय कदम” यांनी साकारली होती तर “मनोरमा वागळे” आणि “विद्या पटवर्धन” यांनी देखील मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. गोकुळदासची भूमिका सुनील शेंडे यांनी केली होती. बिज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत या गाण्याला चाल आणि संगीत अशोक पत्की यांनी दिल होत. मात्र या मालिकेमधील बालकलारांबद्दल जाणून घेणार आहोत.

जॉय घाणेकर याने गोट्या मालिकेतील गोट्याची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. जॉय मिशिगन विद्यापीठातून एमबीए केलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो अमेरिकेत राहत होता. त्यांनी Zynga, Yahoo, Amazon सारख्या प्रसिद्ध कंपन्यांसाठी वरिष्ठ इंजिनिअर, प्रोडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट हेड म्हणून काम केले आहे. तर आता अनेक वर्षांपासून एका Talech कंपनीत प्रोडक्ट हेड म्हणून कार्यरत आहे.

गोट्या या मालिकेतची भूमिका “प्राची साठे” हिने साकारली होती. तसेच राधाचा सासूची भूमिका मनोरमा वागळेने साकारली होती. ती आजारी असतानाही सासूच्या भीतीने घरात भांडी धुताना पाहून गोट्या राधाला मदत करायला यायचा. ‘दुर्गा झाली गौरी’, दूरदर्शनच्या ‘किलबिल’, ‘श्रीकांत’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिकेट काम केलं आहे. तर प्राचीने  संगीतकार केदार पंडित यांच्यासोबत लग्न केलं आहे.

गोट्या मालिकेमधील गण्याची भूमिका पंकज विष्णू याने साकारली होती. गोट्या ज्या हॉटेलमध्ये काम करतो, त्याच हॉटेलमध्ये शंकराया, गन्या, रम्या आणि बाल्या ही चार मुलं काम करत आहेत. विनाकारण राजकारण, सूर्या,पैसा पैसा, युद्ध अश्या मराठी चित्रपटामध्ये अभिनेता पंकज विष्णू यांनी काम केलं आहे. मराठीसह त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील त्याच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.  हरपूल मोहिनी, गुम है किसीके प्यार मै, तुझसे है रबता, CID अश्या अनेक हिंदी मालिकांमध्ये पंकजने काम केलं आहे.

गोट्याच्या मित्राची भूमिका ‘प्रवीण गांगुर्डे’ यांनी केली होती. प्रवीण गांगुर्डे आता डॉक्टर आहेत. ते एमफिल, फिजिओथेरपिस्ट, PSW, MSW, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. गोट्या या मालिकेत गोट्याला “भय्या उपासनी” आणि “मानसी मागीकर” यांनी दत्तक घेतले होते, ज्यांच्या मुलीची म्हणजेच गोट्याच्या बहिणीची भूमिका “समोदा जोशी” यांनी केली होती. मात्र सध्या त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही.

Leave a Comment