मनोरंजन सृष्टीवर पसरली शोककळा, या बाल कलाकाराचे वयाच्या 10 व्या वर्षी निधन…

ऑस्कर अवॉर्डसाठी दरवर्षी भारतामधून अनेक चित्रपटांची नेमणूक केली जाते. या वर्षी गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ (द लास्ट फिल्म शो)ची  देखील ऑस्करसाठी नेमणूक करण्यात आली होती.
परंतु या चित्रपटाच्या एका कलाकारांची  धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Child star of Chelo show dies of cancer; Abandoned at the age of 10)

या चित्रपटाचा बालकलाकार राहुल कोळी याचे निधन झाले आहे. केवळ वयाच्या १० वर्षी त्याने हे जग सोडले आहे. ल्युकेमिया नावाच्या आजाराने तो ग्रस्त होता. २ ऑक्टोबर या बालकलाकाराचा मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपासून राहुलला अहमदाबादमधील कर्करोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी राहुलच्या कुटुंबियांनी त्यांच्या जामनगरजवळील त्यांच्या मूळ गावी हापा येथे राहुलसाठी प्रार्थना सभा ठेवली आहे.

राहुलचे वडील रामू ऑटोरिक्षा चालक आहेत. परंतु राहुलच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी राहुलचे निधन झाल्यामुळे देखील सर्वे लोक दुःखात आहेत.

राहुलचे वडील रामू त्यांचे दुःख व्यक्त करत म्हणाले कि, ‘तो खूप आनंदी होता आणि १४ ऑक्टोबरनंतर आपलं आयुष्य बदलेल असं मला अनेकदा सांगत होता. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.’ असे राहुलचे वडील रामू यांनी सांगितलं.

शुक्रवारी  १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु राहुल हा चित्रपट बघण्यासाठी नसेल. तर १४ ऑक्टोबरला राहुलचा १३वा असणार आहे.  १३व्याल गुजरातमध्ये ‘टर्मू’ असे म्हणतात. या दिवशी मृत्यूनंतरच्या विधी पार पडतात.

१२ दिवसांपूर्वी फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने ९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशासाठी ‘छेलो शो’ या चित्रपटाची निवड केली होती. दिग्दर्शक पान नलिन यांनी ‘छेलो शो’ या चित्रपटाचे  दिग्दर्शन केले आहे.

पान नलिन हे अमेरिकामध्ये स्थित आहेत. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक पान नलिन यांच्या आयुष्यावर प्रेरित असल्याचे समजले आहे.  लहानाचे मोठे ते सौराष्ट्रात झाले होते. त्यानंतर त्यांना  फिल्मी दुनियेची जादू  समजली व त्यांच्या ह्याचित्रपटची कथा देखील अशीच काहिशी आहे.

Leave a Comment