बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख अडकले मोठ्या संकटात; चाहत्यांना बसला धक्का…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे जेनिलिया देशमुख(Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh). या दोघांची जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र या जोडीवर खूप मोठं संकट ओढावल आहे.

या दोघांच्या लातूरमधील कंपनीसाठी फक्त १० दिवसांमध्ये लातूर एमआयडीसीत  भूखंड मंजूर करण्यात आला आहे.(Bollywood’s famous couple Ritesh and Genelia Deshmukh got into a big trouble; Find out what is the case…)

इतकेच नाही तर त्यांच्या  अॅग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी १२० कोटी रुपयांचे कर्ज देखील मंजूर झाल्याचे समजले आहे. या सगळ्यामुळे २०१९ पासूनच १६ उद्योजकाची प्रतीक्षा यादी लातूर एमआयडीसी भागात आहे. परंतु रितेश देशमुख आणि  जेनिलिया देशमुख यांच्या कंपनीला का वगळण्यात आले असेल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

मात्र लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या कंपनीला १२० कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या निकषावर दिले असे पर्सन देखील सगळ्यांना पडत आहेत. लातूर बँकेने या कंपनीवर या विषयी आक्षेप घेतले असून यासंदर्भात पत्रकार परिषद घेतण्यात आले होते. या दरम्यान बँकेने भाजपाने याची चौकशी करावी असे मागणी केली आहे.

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्यावर भाजप आरोप करत म्हणले कि, लातूर एमआयडीसीमध्ये १६ उद्योजकांची प्रतीक्षा यादी आहे. तरी देखील यांच्या कंपनीला म्हणजे देश अॅग्रो केवळ १० दिवसांमध्ये भुखंड मंजूर करण्यात आला आहे.

या वेतिरिक्त भाजपने प्रश्न केला हे कि, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही दिवसांमध्ये ११६ कोटीचा कर्जपुरवठा कसा केला आहे. भाजपने दावा केला आहे कि, लातूर बँकेने रितेश आणि जेनिलिया यांच्या कंपनीवर आक्षेप घेतला आहे.

तर देश अॅग्रो या कंपनीला तत्परतेने भूखंड मंजूरी व कर्जाचा पुरवठा देखील करण्यात आला असा भाजपने रितेश आणी जेनेलिया कंपनीवर आरोप केला आहे. २३ मार्च २०२१ रोजी देश ऍग्रो प्रा. ली या कंपनीची स्थापन झाली होती. कंपनीच्या स्थापनेदरम्यान कंपनीचे भागभांडवल ७.५० कोटी होते. या कंपनीची रितेश आणि जेनेलिया बरोबरचे भागीदार आहेत.

तर भाजपने वरिष्ठ पातळीवरून मागणी करत म्हणत आहे कि, देशमुख यांच्या कंपनीबद्दल लवकरात लवकर चौकीशी करण्यात यावी. एका महिन्यात १२० कोटींचे कर्ज देश ऍग्रो प्रा. ली कंपनीला कसे देण्यात आले? इतक्या कमी वेळात त्यांना कर्ज कसे मंजूर झाले? तर आतापर्यंत लातूर बँकेने  किती जणांना कर्ज दिले आहे? असे आरोप भाजपने  जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्यावर केले आहेत.

आरोप करत भाजपने अनेक प्रश्न विचारले आहेत. भाजपचे म्हणे आहे कि, कोणता निकषावर देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज दिले आहे? मात्र भाजपच्या आरोपांमुळे आणि प्रश्नांमुळे लातूर एमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जेनेलिया आणि रितेश यांनी आणखीन या प्रकरणी कोणत्याच  प्रतिक्रिया दिल्या नाहीत.

Leave a Comment