बॉलिवूडच प्रसिद्ध कपल अनुष्का आणि विराट होणार पुन्हा एकदा आई वडील? हॉस्पिटल…

अभिनेत्री अनुष्का आणि क्रिकेटर विराट कोहली प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक मानले जाते. हे दोघे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचबद्दल चर्चा रंगत आहेत. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. (Bollywood’s famous couple Anushka and Virat will become parents again?)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माला एका  हॉस्पिटल बाहेर स्पॉट केलं गेलं होत. त्यावेळीचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु अद्यापि या बातम्या खऱ्या आहेत की अफवा अजून समजले नाही.

मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये जाताना या कपलला स्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे ते पुन्हा एकदा आई वडील होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं. परंतु ही माहिती खरी नसून, विराट कोहली आणि अनुष्का दुसऱ्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा चकदा एक्सप्रेस हा तिचा आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चकदा एक्सप्रे हा चित्रपट भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर झूलन गोस्वामीवर आधारित आहे. अनुष्का या चित्रपटामध्ये स्पोर्ट्समॅनची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी अनुष्का बॉलिंगचे प्रशिक्षण देखील घेत आहे. त्यामुळे अभिनेत्री कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट चेकअपसाठी गेली होती.

विराट आणि अनुष्काचा हा जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ती पुन्हा प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगत आहे. तर हे जोडपं व्हेकेशनसाठी मोनोकिनीमध्ये गेले होते. तिथले बीचवरचे त्यांचे अनेक फोटो शेअर झाले आहेत.

विराट आणि अनुष्का सुट्टीवर त्यांच्या मुलगी वामिका सोबत गेले होते. हे जोडपं व्हेक्शननंतर हॉस्पिटलमध्ये जाताना स्पॉट झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला होता. परंतु आता अनुष्का फिजिओथेरपिस्टला भेटायला गेल्याची बातमी समोर आल्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातमीला पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान  चकदा एक्सप्रेस या चित्रपटामधून अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे.  चार वर्षांपूर्वी ती  तिच्या चाहत्यांना चित्रपटामध्ये दिसली होती. २०१८ मध्ये अनुष्काने शाहरुख खानसोबत काम केलं होत.

Leave a Comment