बॉलिवूड हादरले! ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन…

हिंदी सिनेसृष्टीतीतील प्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आजीचे निधन झाले आहे.

याची माहिती त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. कुणाल त्याच्या आजीच्या खूप जवळ होता.

यामुळे त्याला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आहे. त्याने इंस्टाग्रामवर आजीसोबतचा फोटो शेअर करत एक  भावनिक पोस्ट लिहिली आहे.

कुणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची मुलगी इनाया देखील दिसत आहे. रविवारी कुणालच्या आजीचे निधन झाले.

फोटो शेअर करताना त्याने  लिहिले आहे की, “मी आज माझ्या आजीला गमावले. आम्ही सर्वजण तिला माजी म्हणत होतो. तिने हे नाव वास्तवामध्ये कमवले आहे.

ती एका आईप्रमाणे आमच्यावर खूप प्रेम करायची, माया करायची. आम्ही जेव्हा तिच्यासोबत होतो तेव्हा ती आम्हाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती.

माझ्याजवळ तिच्या खूप आठवणी आहेत. ती मला गोष्टी सांगायची. मला स्वतःच्या हाताने जेवण भरवायची. मला खेळवायची आणि माझी खूप काळजी घ्यायची.

तिने माझ्यासाठी अशा गोष्टी खरेदी केल्या ज्यासाठी माझे पालक परवानगी देत नव्हते. ती मला नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आत्मविश्वास द्यायची.

ती माझ्यासाठी एक सर्वात मोठी चियरलीडर होती. ती माझ्यासाठी शक्ती, दया, आणि प्रेमाचे प्रतीक होती. मी तिला नेहमी हसताना पहिले आहे,

आठवतच नाही की ती कधी रडलीये. मी नेहमी तिला तिच्या कामामध्ये मग्न असताना पहिले. तुला नेहमीच मिस करेन आज्जी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

कुणालने बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तो लूटकेस या चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता.

या चित्रपटातील त्याच्या अभिनयास प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्याच्याजवळ आगामी चित्रपट देखील आहेत.

तो विपुल मेहताच्या कंजूस मक्खीचुस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत श्वेता त्रिपाठी आणि पियुष मिश्रा देखी मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Comment