बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खरेदी केला मुंबईत नवीन लक्झरी फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधला ऍक्शन हिरो म्हणून अभिनेता अक्षय कुमारला ओळखले जाते. त्याचसोबत व्यस्त अभिनेता आणि फिटनेससाठी देखील अक्षयचे नाव आहे. (Bollywood actor Akshay Kumar buys new luxury flat in Mumbai; You will be surprised to hear the price.)

अक्षय त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत येत असतो. मात्र आता तो एक वेगळ्या कारणांवरून चर्चेत आला आहे.  मुंबईमध्ये अक्षय कुमारने एक नवा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तर असे देखील समजत आहे अक्षयने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहेत.

या अभिनेत्याने मुंबईमध्ये एक आलिशान घर घेतलं आहे. त्याचे हे घर खारमध्ये पश्चिम दिशेला आहे. तसेच त्याचा हा फ्लॅट खारमधील जॉय लिजेंड बिल्डिंगमध्ये १९ व्या मजल्यावर आहे. ही माहिती स्क्वेअरफीटइंडिया डॉट कॉमनं दिली आहे. परंतु अद्याप या बद्दल आणखीन कोणते ठोस पुरावे मिळाले नाहीत.

तर असे देखील समजले आहे कि, अक्षयने त्याचे जुने  अंधेरी पश्चिममधले ऑफिस डिसेंबर महिन्यात विकला होते. त्याचे त्याला ९ कोटी रुपये मिळाले होते.  या आलेल्या रक्कमे मधून अक्षयने नवीन फ्लॅट घेतला आहे. अक्षयने घेतलेल्या नवीन फ्लॅटची किंमत ७ कोटी ८४ लाख रुपये असल्याचे समजले आहे. यासोबतच अक्षयला चार वाहनांच्या पार्किंगसाठी भरपूर जागा सुद्धा मिळाली आहे.

स्टॅम्प ड्युटी साठी अक्षयने तब्बल ३९ लाख २४ हजार भरावे लागले आहेत. समजलेल्या माहितीनुसार अक्षयने फ्लॅट घेतलेल्या अपार्टमेंटचा रेडी रेकनर दर हा ७ कोटी २२ लाख रुपये आहे. ७ जानेवारी २०२२ रोजी अक्षय घराच्या करारा पूर्ण करणार आहे.

मात्र आता अक्षय कुमार एका सी फेसिंग फ्लॅटमध्ये त्याच्या परिवारसोबत राहत आहे. मुंबई शहर वगळता अक्षयची गोवा आणि मॉरिशसमध्य सुद्धा चंगली प्रॉपर्टी आहे. तसेच अक्षय  बॉलिवूडमधला सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेता आहे. अक्षय त्याचा आगामी चित्रपटा करण्यासाठी  १३५ कोटी रुपये घेतल्याचे समजले आहे.

दरम्यान, बच्चन पांडे या आगामी चित्रपटामधून अक्षय त्याच्या चाहत्यांनच्या भेटीस आला होता. १८ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचसोबत अक्षयचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर अक्षय OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या कामात आहेत. या शिवाय तो लवकरच ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

 

Leave a Comment