धक्कादायक!!! बिग बॉस १६ फेम सौंदर्या घरात करत होती अंघोळ; चुकून शालीनने उघडला बाथरुमचा दरवाजा अन्…

बिग बॉस १६ हा शो छोट्या पाड्यावर प्रचंड चालत आहे. या शोसह अनेक सदस्य प्रसिद्ध झाले आहेत. सोशल मीडियावर रोज बिग बॉस आणि सदस्यांची चर्चा रंगत असते. त्यात  शालीन भानोत, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि शिव ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. (Bigg Boss 16 fame Soundarya was taking a bath; Shaleen accidentally opened the bathroom door, video went viral..)

बिग बॉसचं १६ वा सीझन खूप गाजला आहे. तसेच या शोमधील सदस्य सतत चर्चेचा विषय ठरत असतात. १०० पेक्षा जास्त बिग बॉसच्या घरात कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे घरामधील सदस्य दिवस भर काय करतात काय नाही हे सर्वांना दिसत आहे. परंतु यामुळे कधी कधी  सदस्यांना लाजिरवाण्या प्रसंगांचा सामना करावं लागतो. असा एक प्रकार शालीन आणि सौंदर्या यांच्याबरोबर घडला आहे.

एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होत कि, सौंदर्या शर्मा अंघोळ करत होती. त्यावेळी तिने आत मधून बाथरुमचा दरवाजा बंद केला नव्हता. शालीन देखील अंघोळ करायला जातो. मात्र शालीनला माहीत नव्हते कि बाथरुममध्ये सौंदर्या आहे. तो चुकून बाथरुमचा दरवाजा उघडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यावरून चर्चा रंगत सुद्धा दिसत आहेत.

सौंदर्या बाथरुममध्ये अंघोळ करत असताना शालीन चुकून बाथरुमचा दरवाजा उघडतो. परंतु तो दरवाजा  पूर्ण उघडत नाही. तो दरवाजा ढकलत असतानाच सौंदर्या आतून दरवाजा बंद करते. त्यानंतर सौंदर्या आतून ओरडते,  “तू दरवाजा ठोठावू शकत नाही का?”.

यावर उत्तर देत शालीन घाबरत म्हणतो कि, “मला माहीत नव्हतं सौंदर्या. मी जाणून बुजून हे केलेलं नाही.” त्यानंतर शालीन त्या बाथरूमपासून निघून जातो. दरम्यान या प्रकरणानंतर शिव ठाकरे सौंदर्याची चेष्टा करताना दिसत आहे.

त्यावेळी शिव सौंदर्याला म्हणतो कि, “तो कडी न लावल्याचा मुद्दा नेमका काय?” यावरून सौंदर्या शिव वर संताप व्यक्त करते.  या प्रकरणाला वादाचा मुद्दा न बनवता चांगल्याप्रकारे संपूर्ण प्रकरण हाताळताना सौंदर्या दिसते.

Leave a Comment