अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्या चाहत्त्यांसाठी दुःखद बातमी…

महराष्ट्रात भरपूर चित्रपट बनतात. चित्रपटाचे निरीक्षण करण्यासाठी अनेक संस्था देखील आहेत. त्यातील एक आहे चित्रपट महामंडळ. चित्रपटासाठी काय करता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल अनेक निर्णय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.(Big sad news regarding actress Alka Kubal and Priya Berde)

चित्रपट महामंडळाचे मुख्यालय कोल्हापूरमध्ये आहे. चित्रपट महामंडळाचा सगळं कारभार कोल्हापुरामधूनच चालत असल्याचे दिसते. अनेकांचे म्हणणे आहे कि, महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असतात.  त्यामुळे ही निवडणूक लढण्याची अनेकजणांची इच्छा देखील नसते.

मात्र वर्षानुवर्ष पासून या संस्थेवर काही कलाकार हे कार्यरत असल्याचे दिसत आहे. परंतु या संचालक पदावर कार्यरत  असणाऱ्या अनेक जणांवर अनेक आरोप झाले आहेत. अनेकांचे असे म्हणे आहे कि, महामंडळाच्या संचालक पदावरूनच गैरव्यवहार करता येतात. अशेच एक प्रकरण आता समोर आल्याचे दिसत आहे. २०१२ मधील हे प्रकरण आहे. अनावश्यक खर्चामुळे हे प्रकरण न्यायालया पर्यंत जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ कलाकारांना दणका बसला आहे.

अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, प्रकाश सुर्वे यांच्यासह अनेक कलाकारांचा या प्रकारांत समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोर्टात या कलाकारांना काही रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्यावर आणखीन संकट आल्याचे दिसत आहे. एकंदरीत हे प्रकरण आता प्रचंड बिगडल्याचे दिसत आहे. 

मिळाल्या माहितीनुसार या एका प्रकरणामुळे सगळ्या कलाकारांना मोठा झटका बसला आहे. मानाचा मुजरा हा कार्यक्रम पुण्यात करण्यात आला होता. त्या दरम्यान या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक खर्च तब्बल ११ लाख रुपये करण्यात आला होता म्हणून न्यायालयाने चित्रपट महामंडळाकडे आदेश दिले आहेत कि, लवकारा लवकार ते पैसे भरावे. या प्रकरणामध्ये अलका कुबल, प्रिया बेर्डे, प्रकाश सुर्वे, विजय पाटकर यांचावर देखील आरोप केले गेले आहेत.

मानाचा मुजरा हा कार्यक्रम २०१२ साली पुण्यामध्ये करण्यात आला होता. चित्रपट महामंडळाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला होता. तब्बल ५२ लाख रुपये या कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमामध्ये ११ लाख  अनावश्यक खर्च झाला होता.

त्यामुळे याबाबतीत अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालया पर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचले होते. मात्र आता उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत ज्यामुळे या सगळ्या दिग्ज कलाकारांना मोठा दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने या कलाकारांना पैसे लवकर जमा करण्यास सांगितले आहे.

सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी अनेकांनी या खर्चाबाबत नापसंती व्यक्त केली होती. मात्र तत्कालीन संचालकांकडून हा  खर्च केला केला गेला होता. त्यामुळे न्यायालयात हे प्रकरण न्यावं लागले. या प्रकरणातील पैसे संचालकांना भरावे लागणार आहेत.

Leave a Comment