सैराट फेम अनुजा मुळे चित्रपटसृष्टी सोडून आता करते हे काम; जाणून तुम्हीही व्हाल हैराण…

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट हिट ठरतात. परंतु काही असे असतात जे प्रेक्षकांच्या मानत घर करून जातात. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट अश्याच चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होत. (Anuja of Sairat fame left the film industry and now does this work)

हा चित्रपट तसेच यातील कलाकार खूप लोकप्रिय झाले होती. आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स या भूमिका खूप गाजल्या होत्या. या चित्रपटामध्ये आणखीन एक भूमिका गाजली होती ती म्हणजे आर्चीच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी आनी. अनुजा मुळेने आनीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.

या चित्रपटामुळे यातील अनेक कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली होती. तर आर्ची म्हणजेच  रिंकु राजगुरू व परश्या म्हणजेच आकाश ठोसर यांना चित्रपट सृष्टीमध्ये नवीन कामे मिळू लागली होती. परंतु आनी म्हणजेच अनुजा मुळेला या चित्रपटा नंतर कोणत्याच चित्रपटाची ऑफर आली नाही.

तसेच ही अभिनेत्री आता कुठे आहे व काय करते हे कोणालाच माहिती नाही. परंतु आज आपण या लेखातून अनुजा मुळे बद्दल जाणून घेणार आहोत. माहितीनुसार ही अभिनेत्री आता चित्रपटसृष्टीमध्ये नाही तर एका वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर लागली आहे.

सैराट हा अनुजाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून तिला प्रसिद्धी मिळाली होती.परंतु या चित्रपटनानंतर अनुजा कोणत्या चित्रपटामध्ये झळकली नाही. त्यामुळे तुच्या चाहत्यांना ती सध्या कुठे असते आणि काय कारते असे प्रश्न पडू लागले आहेत. तर सोशल मीडियाच्या आस्क मी नाऊ या सेशनद्वारे अनुजाने तिच्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

या सेशनमध्ये तिच्या एका चाहत्यांनी तिला तू सध्या काय करते असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तिने स्वतःचा वकिलाच्या कपड्यामधला फोटो पोस्ट करत वकिली असे उत्तर दिले होते. या वरून लक्षात येते कि अनुजा आता सध्या वकिलीचा अभ्यास करत आहे.

अनुजाने वकिलीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सैराट चित्रपटाचे अनेक कलाकार चित्रपट सृष्टीमध्ये झळकत आहेत. तर त्याच्या उलट आनी मात्र वकीलीच्या क्षेत्रात करिअर घडवत आहे. परंतु अनुजाने सांगितलं कि, जर तिला पुन्हा संधी मिळाली तर ती नक्कीच चित्रपटामध्ये काम करेल.

जेव्हा अनुजा पुण्यामध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी तिने एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. चिट्ठी या एकांकिकेमध्ये तिने कमी केलं होत. तर या एकांकिकेतील तिच्या पात्रासाठी तिला  पुरस्कार देखील मिळाले होते. यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधल्या आनीच्या भूमिकेसाठी अनुजाला निडवले होते.

Leave a Comment