अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज; फोटो शेअर करत सांगितली ही सुखद बातमी…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नाव येते. अंकिता प्रवित्र रिश्ता या मालिकेतून खूप प्रसिद्ध झाली होती. याच मालिकेमधून अंकिताने  छोट्या पाड्यावर पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना या पात्राची भूमिका साकारली होती.(Ankita Lokhande gave good news to fans; Share this happy news)

या भूमिकेने अंकिताला खूप लोकप्रिय बनवले होते. त्यानंतर सहायक अभिनेत्री म्हणून ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. परंतु ती लवकरच तिच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अंकिताने कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामधून २०१९मध्ये सहायक भूमिका साकारत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘बागी 3’ या चित्रपटामध्ये अंकिता सहायक भूमिका  साकारताना तिच्या चाहत्यांना दिसली होती. मात्र ती लवकरच ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटामधून मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. अंकितासोबत नायकाच्या मुख्य भूमिकेत रणदीप हुड्डा साकारणार आहे.

ही माहिती स्वतः अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर दिली आहे. तिने एक फोटो शेअर करत आगामी चित्रपटाची माहिती देत भलं मोठं कॅप्शन लिहलं आहे. तिने यावेळी स्वतःचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला आहे. अंकिताचा हा रेट्रो लूकमदला फोटो खूप सुंदर दिसत आहे. त्या फोटोला कॅप्शन देत ती लिहते, ती ही बातमी जाहीर करण्याची वाट पाहत आहे!. अंकिता स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा प्रवास सुरु करण्यासाठी ती  प्रतीक्षा नाही करू शकत. असे ती म्हणत आहे.

पोस्टमध्ये पुढे अंकिता लिहते, संदीप सिंगशिवाय हे शक्य झाले नसते. ते माझे खूप मोठा आधार आणि सर्वोत्तम मित्र आहात. तुमचा प्रवास कौतुकास्पद आहे, निर्माते साहेब. आनंद पंडित सर या संधीसाठी तुमचे खूप खूप आभार. शेवटी इतकंच बोलते आमचे दिग्दर्शक रणदीप हुडा तुम्ही अतिशय प्रतिभावान अभिनेता आहात.

अंकिताने ही पोस्ट शेअर करताच अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचे पटकथा लिहली आहे. तर  रणदीप हुड्डा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

मुंबई आणि लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार असल्याची माहिती मिळाली आहे. रणदीप हुड्डा पूर्वी दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनि या चित्रपटाचे नेतृत्व केले होते. २६ मे २०२३ रोजी वीर सावरकरांच्या १४०व्या जयंती निमित्त हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Comment