वय म्हणजे फक्त एक आकडा आहे, हे या 10 जोडप्यांकडे पाहून समजतं…!!

प्रियंका चोप्रा आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत ती लग्न बंधनात अडकली. निक प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघेही संसारात आनंदी आहेत. संजय दत्त व मान्यता दत्त या दोघांच्या वयामध्ये जवळपास 19 वर्षांचं अंतर आहे. आज हे कपल आनंदाने नांदतेय.

करिना कपूर व सैफ अली खान यांच्यात तर वयाचा मोठा फरक आहे. करिना ही सैफपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. दोघांनाही दोन मुलं आहेत. मिलिंद सोमन त्याची बायको अंकिता या दोघांत वयाचे खूप मोठे अंतर आहे. दोघे यावरून ट्रोलही होतात. मिलिंद हा अंकितापेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे.

शाहिद कपूर व मीरा राजपूत बॉलिवूडचे क्यूट कपल. या दोघांत 13 वर्षांच अंतर आहे. शाहिद मीरापेक्षा मोठा आहे. मराठी सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. मराठीचे दिग्गज अभिनेत अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे.

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक आहे. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल. रितेश हा जिनिलीया पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे.

मराठीतील क्यूट कपल उमेश कामत व प्रिया बापट यांच्या वयात 8 वर्षांचे अंतर आहे. टीव्हीवरचे लोकप्रिय कपल किश्वर मर्चंट व सुयश राय यांच्यात 8 वर्षांचे अंतर आहे. किश्वर सुयशपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.

Leave a Comment