सोनाक्षी सिन्हा आहे रीना रॉय यांची मुलगी, खूप वर्षांनी समोर आले सत्य. जाणून व्हाल थक्क…

प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने ७० च्या दशकात सर्वांना वेड केलं होत. ही अभिनेत्री चर्चेचा विषय देखील अनेक वेळा ठरली आहे. (Actress Sonakshi Sinha looks like a carbon copy of actress Reena Roy)

७० च्या दशकामध्ये अभिनेत्री रीना रॉय तिच्या अफेयरमुळे सतत चर्चेत राहत होती. तसेच अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबत तिचे अफेयर असल्याचा चर्चा झाल्या होत्या. मात्र असे देखील समजलं होत कि, शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नानंतर सुद्धा हे दोघे एकमेकांना डेट करत होते. ज्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण होत होत्या.

कालीचरण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हे दोघे १६ चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. शत्रुघ्न सिन्हा विवाहित असून देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते.

शत्रूग्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाचा चेहरा बऱ्यापैकी रीना रॉयच्या चेहऱ्यासारखा दिसतो. असं सांगितलं जात की शत्रूग्न सिन्हा यांच्या प्रेमात रीना रॉय पूर्णपणे बुडाल्या होत्या. त्या सतत शत्रुघ्न सिन्हा यांना म्हणत असे कि,  पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत लग्न करा. परंतु शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या पत्नीला घटस्फोट इच्छिक नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला नाही.

पहलाज निहलानी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार. जेव्हा 1982 मध्ये रीना रॉयला चित्रपटाची ऑफर आली होती. तेव्हा रिनाने पहलाज निहलानी यांना सांगितले होते की तुझ्या मित्राला जाऊन विचार मी त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. जर त्याचा होकार असेल तर मी त्यांच्यासोबत चित्रपटात काम करेल. अन्यथा येणाऱ्या ८ दिवसांमध्ये मी लग्न करेल.

शत्रुघ्न सिन्हाला ही गोष्ट जेव्हा पहलाज निहलानीने फोनवर सांगितली तेव्हा ते प्रचंड रडले होते. त्यानंतर क्रिकेटर नौशीन खानसोबत रीना रॉयने लग्न केलं होत. परंतु २०१० मध्ये सोनाक्षी सिन्हाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले तेव्हा पुन्हा एकदा लोकांच्या मनात शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या आफेरच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

रीना रॉयच्या लूकची तुलना करून आणि वडिलांच्या अशा गोष्टी ऐकून सोनाक्षीने काही दिवस या विषयावर काही न बोलणं पसंत केलं होत. परंतु नंतर तीने आपले मौन तोडले आणि लोकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.

सोनाक्षी म्हणाली, “मला वाटतं, मी जन्मलेही नव्हते तेव्हा हे घडलं होतं. जेव्हा मी मोठी होत होते आणि मला गोष्टी समजू लागल्या तेव्हा मला हे कळले. पण यासाठी मी माझ्या वडिलांना शिक्षा करणार नाही. हा त्यांचा भूतकाळ आहे. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. त्यामुळे मी त्याचा फारसा विचार करत नाही. तसेच मी त्याकडे लक्ष देत नाही. मी म्हटल्याप्रमाणे, ते फक्त काही लोकांसाठी आहे चांगले मथळे आणि रसाळ गप्पा बनत आहे. पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहे.”

Leave a Comment