अभिनेत्री श्रुती हासनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, या मुळे चेहऱ्यावर…

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींया कोणत्या देखील कारणांवरून चर्चेत येत असतात. बॉलिवूडमधल्या खूप कमी अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप उघडपणे सांगत असतात. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रुती हसन हिचे आहे. श्रुती तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे सांगत असते. नुकतंच तिने  तिच्या नाकाच्या शस्त्रक्रियाबद्दल सांगितले आहे. तिच्या सुंदर चेहरा आणखीन सुंदर दिसावा म्हणून तिने नाकाची सर्जरी केली आहे. (Actress Shruti Haasan’s nose surgery said; ‘I wanted to look more beautiful but..)

स्वतःच्या लूक्सबद्दल बोलत श्रुती म्हणाली कि, कोण तिच्या बद्दल काय विचार करत याचा तिला काहीही फरक पडत नाही आणि ती त्या गोष्टी मनाला देखील लावून घेत नाही. तिचं शरीर आहे आणि या शरीराला ती हवे तसे ठेवेल.असे देखील श्रुतीने सांगितलं आहे.

एका मुलाखती मध्ये तिच्या सर्जरीबद्दल मीडियाशी बोलली होते. तेव्हा श्रुती म्हणाली कि, “मी नोज जॉब केला आहे. माझं नाक आधी रेखीव नव्हतं  आणि खूप वेगळं झालं होतं. मी माझा पहिला चित्रपट मी रेखीव नसलेल्या नाकाने केला होता. नंतर मी त्याची सर्जरी केली. कारण मला ते सुंदर बनवायचं होतं. मला माझा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर अडचण काय आहे. मी कशी दिसते किंवा दिसत नाही हे कोणालाच जस्टिफाई नाही करु शकत. माझं शरीर आहे. मला ते हवं तसं मी ठेवेन.”

मुलाखतीत पुढे अभिनेत्री म्हणाली कि, “मी या गोष्टींना प्रमोट करत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर बिंधास्त करा आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर ते अजिबात करू नका, परंतु मला जे करायचे आहे ते करू द्या”.

सुरुवातीला श्रुतीला असे देखील म्हटलं जात होत कि, ती हिरोईनसारखी दिसत नाही. पुढे ती म्हणाली कि, “लोकं माझ्याबद्दल म्हणायचे, “श्रुतीचा चेहरा परदेशींसारखा दिसतो, तिच्यात टॅलेंट आहे पण ती भारतीय दिसत नाही पण जेव्हा मी चित्रपट करायला सुरुवात केली तेव्हा मला गावाकडच्या मुलीचे रोल जास्त मिळाले.”

श्रुतीचा लवकर एक आगामी चित्रपट येणार आहे ज्यामध्ये ती प्रभाससोबतमुख्य भूमिकेत दिसणार आहे. सालार असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्यानंतर ती मेगा १५४ या चित्रपटामध्ये चिरंजीवी यांच्यासोबत झळकणार आहे.

Leave a Comment