‘शिक्षणाच्या आयचा घो’ या मराठी चित्रपटातील लहान मुलगी दिसतीय आता खूप हॉट आणि बोल्ड; पाहून तूम्हीही व्हाल थक्क…

मराठी चित्रपटविश्वात अनेक चित्रपट येतात अनेक जातात. परंतु प्रेक्षनकांच्या मानत घर करून जाणारे काही मोजकेच चित्रपट ठरतात.  शिक्षणाच्या आयचा घो हा चित्रपट मनात घर करून जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.  (Actress Gauri Vaidya who played the role of little girl in the Marathi movie ‘Shikshanache Aicha Gho’ looks very hot and bold now)

शिक्षणाच्या आयचा घो हा चित्रपट खूप गाजला होता. २०१०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आणि चित्रपटामधील कलाकारांनी प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. महेश मांजरेकर यांनी हा मराठी चित्रपट दिग्दर्शत केला होता.

तसेच यात अनेक प्रेसिद्ध कलाकारांनी काम केलं आहे. सचिन खेडेकर, भारत जाधव, साक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये सर्वाना दिसले होते. तर या चित्रपटामध्ये  दोन बालकलाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. हे बाल  कलाकार भरत जाधवची मुलांची भूमिका करताना दिसली आहेत.

गौरी वैद्य (Gauri Vaidya) आणि सक्षम कुलकर्णी(Saksham Kulkarni)  अशी या बाल कलाकारांची नावे आहेत. तसेच  या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे हे दोनी बालकलाकार सुद्धा आता मोठी झाली आहे. ज्यामुळे त्यांना ओळखणं आता जरा कठीणच झालं आहे.

या चित्रपटामध्ये  गौरी वैद्यने दुर्गाची भूमिका केली होती. तर श्रीनिवास राणेची भूमिका सक्षम कुलकर्णी याने उत्तम रित्या साकारली होती. शिक्षणाच्या आयचा घो हा संपूर्ण चित्रपट सक्षम कुलकर्णी म्हणजेच श्रीनिवास राणे याच्या भोवती गुंडाळला होता.

या चित्रपटामध्ये दाखवलं होत कि,  श्रीनिवास राणे एक सरासरी विद्यार्थी आहे. ज्याची बुद्धी अभ्यासात कमी आणि खेळात जास्त चालत होती. परंतु घरच्या किंवा आई वडिलांच्या दबावाने काय होऊ शकत असे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.

तसेच या चित्रपटामध्ये दिसले आहे कि, त्याने क्रिकेट खेळण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा आहे. श्रीनिवास, ज्याला अभ्यासात बिकूल रस नव्हता. तो दबाव हाताळू शकत नाही आणि हे वडील मुलाचे नाते बिघडवण्याच्या त्याच्या मानसिकतेवर प्रतिबिंबित होते.

तेव्हा रागाच्या भरात वडील असे काहीतरी करतात ज्याचा त्यांना पश्चात्ताप होतो. यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटमध्ये खूप चांगला संदेश देण्यात आला आहे.

या चित्रपटामध्ये श्रीनिवाची बहीण दुर्गाची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली आहे. तिने तिच्या उत्तम अभिनयामुळे सर्वांचे लक्ष वेधलं होत. परंतु ही अभिनेत्री आता खूप मोठी झाली आहे. त्यामुळे तिला ओळखणं सुद्धा काठी झालं आहे.

आता गौरीने वयाची २६वी गाठली आहे. तिने तिचे शिक्षण मुंबईमधील माटुंगा येथील ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून घेतलं आहे. त्यानंतर पदवी तिने  इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शाखेतून घेतली आहे.

मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने अभिनया क्षेत्राला काही काळ रामराम ठोकला होता. त्या दरम्यान तिने कोणत्याच चित्रपटामध्ये काम कल नाही. परंतु ती लवकर चित्रपट क्षेत्रामध्ये आगमन करणार असल्याचे समजले आहे.

शिक्षणाच्या आयचो घो या चित्रपटानंतर सक्षमने आणि गौरीने दे धक्का या चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर रियालिटी शो एकापेक्षा एक जोडीचा मामला या शोमध्ये हे दोघे एकत्र सहभागी झाले होते.

आवाहन या चित्रपटामध्ये गौरी दिसली होती. हा चित्रपट २०१५ प्रकाशित झाला होता. आवाहन हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटामध्ये गौरीने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

त्याचसोबत या चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार दिसली होती. त सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे अशी त्यांची नावे आहेत.

Leave a Comment