चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची पत्नी करते असे काम; जाणून कराल कौतुक…

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक खलनायक आले. परंतु राजशेखर हे असे नाव होते जे खलनायक भूमिकेची व्याख्या बनले. त्यांनी मराठीसह आणि हिंदी चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. (Actor Rajasekhar’s , who plays the villain in the film, now his wife does  commendable job)

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जर निळू फुले यांच्यानंतर खलनायक म्हणून कोण ओळखले जात असतील तर ते राजशेखर होते.  त्यांना कधीच कुठल्या  मेकअपची गरजच पडली नाही. ते त्यांच्या बेरकी नजर आणि आवाजातला करारेपणाने त्यांच्या खलनायकाची भूमिका साकारत असे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.

त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं होत. त्यांनी लाखात अशी देखणी, वारणेचा वाघ, ज्योतिबाचा नवस, धर्मकन्या, देवा तुझी सोन्याची जेजुरी, मल्हारी मार्तंड, बारा वर्षे सहा महिने तीन दिवस अश्या चित्रपटांमध्ये  खलनायकाची भूमिका केली आहे.

राजशेखर जर चित्रपटामध्ये क्रूर खलनायकाची भूमिका साकारत असेल तरी ते खऱ्या आयुष्यामध्ये खूपच हळव्या मनाचे होते. त्यांनी स्वतःचे एक वृध्दाश्रम सुरु केले होते. राजशेखर नेहमी म्हणत असे, राजकारण हा आपला पिंड नाही. मात्र पुढील आयुष्यात त्यांनी त्यांचा कल समाजसेवेकडे नेला. त्यांनी मातोश्री नावाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंबूखडी येथे वृध्दाश्रम सुरु केले होते.

मात्र राजशेखर यांच्या मृत्यू नंतर त्यांची पत्नी हे वृध्दाश्रमाची काळजी घेत आहे. वैशाली राजशेखरअसे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. वैशाली या अनेक वर्षांपासून या आश्रमामध्ये राहूनच आश्रमाची आणि त्यातील लोकांची काळजी घेत आहेत. त्याच्या या समाजसेवेसाठी त्यांना भगिनी पुरस्कारा देखील देण्यात आला आहे. तर त्यांनी काही काळ शिवसेना जिल्हा आघाडीच्या जिल्हा प्रमुख पदी जबाबदारी सांभाळली होती.

मध्यंतरी झालेल्या त्यांच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्या खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. याबद्दलच त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिनेता स्वप्नील राजशेखर याने एक पोस्ट केली होती. त्यानी पोस्टमध्ये लिहलं होत कि, “या वर्षी जानेवारी मधे आईच्या मणक्याच्या चकतीचं ऑपरेशन झालं.  त्याआधी महिनाभर असह्य वेदनांनी ती अंथरुणाला खिळली होती. कळत्या वयापासुन ते आज ८० वयापर्यंत स्वावलंबी आणि सतsत कार्यरत असणाऱ्या आणि तीच जगण्याची मूळ प्रेरणा असणाऱ्या आईसाठी असं अंथरुणावर पडुन रहाणं आणि परावलंबत्व हे मणक्यांच्या वेदनांपेक्षा भीषण होतं. हालचालीवर निर्बंध होते.”

पुढे स्वप्नीलने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या डॉक्टरांचे म्हणे सांगितले आहे. तेव्हा तो म्हणाला कि, “डॉक्टर म्हणाले कि, “ऑपरेशन नंतरही पुढे चार महिने बेड रेस्ट सांगीतली होती. हालचालीवर निर्बंध होते. डॉक्टर म्हणाले “आता हे पुढचं आयुष्य बोनस म्हणुन घ्या… स्वस्थ बसुन रहा.. जादु होणार नाही.. तुमचं तुम्हाला बाथरुमपर्यंत जाता येईल तेवढं नशिब मानायचं.. आश्रमाचं काम तर सोपवा ईतरांवर.”

“त्याने जे सांगितले ते बरोबर होते. आईने ते सर्व ऐकून घेतले, शक्य तितका संयम ठेवला, हळू हळू वाटचाल सुरू झाली, आत्मविश्वास म्हणजे चार महिन्यांत जमा होण्यास सुरुवात झाली. तिथेच राहिले. थोडं चालायला लागल्यावर तिचा पूर्वीचा दिनक्रम सुरू झाला..रोज घरातून आश्रमात जाणं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घरी परतणं, सगळं नीट सुरू होतं आणि तिला थांबवणं आमच्या हातात नव्हतं.”

” त्याचा काही उपयोग नाही. तिचं काम सुरू होतंय हेही आम्हाला माहीत आहे, पण ती आनंदाने सुरू आहे. दुसऱ्या दिवशी अक्कलकोट तुळजापूरला जाण्याचा हट्ट धरला. तिचा आत्मविश्वास आणि विश्वास हेच या प्रश्नाचं उत्तर आहे.”

“१८ तासांचा गाडीचा प्रवास, सर्व अनिवार्य चालणे, शौचालय नसल्यामुळे होणारी गैरसोय, जन्माला आलेले सर्व काही पूर्ण केलेली स्त्री एका वेळी रिक्षाच्या मागेही बसू शकत नाही. जागा इतकंच. अपने घर मे भी बच्चन है”

Leave a Comment