कभी ख़ुशी कभी गम चित्रपटातील काजोलचा मुलगा आता दिसतो खूपच हँडसम, फोटो बघून व्हाल थक्क…

करण जौहर दिग्दर्शित कभी खुशी कभी गम हा चित्रपट खूप गाजला होता.  बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने खूप कमाई केली होती. (Actor Gibran Khan  who played Kajol’s son Krish role in Kabhi Khushi Kabhi Gham now looks very hot and handsome)

कभी खुशी कभी गम या चित्रपटामुळे चित्रपटगृह हाउसफुल झाले होते. सुपरस्टार शाहरुख खान आणि काजोलची जोडी या चित्रपटामध्ये होती. यांच्या शिवाय चित्रपटामध्ये करीना आणि ऋतिक रोशन देखील दिसले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील सर्व कलाकारांचे खूप कौतुक झालं होत.

या चित्रपटामध्ये काही बाल कलाकार देखील दाखवण्यात आले होते. या बालकलाकारांची देखील खूप चर्चा होत होती. त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत होते. या चित्रपटामध्ये एक गोड मुलगा दाखवला गेला होता. ज्याने काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका केली होती. कृष असे चित्रपटामध्ये त्या मुलाचे नाव होते.

जिब्रान खान असे त्या बालकलाकाराचे नाव होते. जिब्रान खानने  कभी खुशी कभी गम या चित्रपटामध्ये कृषची भूमिका साकारली होती. जिब्रान खानने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. मात्र आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे हा बालकलाकार आता खूप मोठा झाला आहे.

त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोला बघून त्याला ओळखणं थोडं कठीण झालं आहे. जिब्रानच्या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर जिब्रान खानने कभी खुशी कभी गम या चित्रपटानंतर त्यांनी  गोविंदाच्या क्योंकि मैं झूठ नहीं बोलता या चित्रपटामध्ये सुद्धा बालकलाकाराची भूमिका साकारली होती. गोविंदा आणि सुश्मिता यांच्या मुलाची भूमिका जिब्रान खानने केली होती.

यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. त्यात रिश्ते या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटामधील त्याची भूमिका प्रचंड गाजली होती.  चित्रपटांसोबत त्याने एका टीव्ही मालिकेत देखील काम केलं होत.  विष्णु पुराण असे त्या मालिकेचं नाव होते.

सोशल मिडियावर जिब्रान खानने कभी ख़ुशी कभी गम चित्रपटामधला एक व्हिडिओ शेअर केला होता.  त्या व्हिडिओमध्ये जिब्रान म्हणतोय कि, आयुष्यात काही मिळवायचे असेल, तुम्हाला काही जिंकायचे असेल, तर नेहमी तुमच्या हृदयाचे ऐका आणि जर मनातून काही उत्तर नाही आलं. तर मग, डोळे बंद करा आणि आपल्या पालकांना विचारा. मग तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता का ते पहा.

जिब्रानने त्याच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचा हा लुक पाहून  त्याचे अनेक चाहते थक्क झाले आहेत. अनेकांना तर लहान कृष आता असा दिसत आहे याचावर विश्वास बसत नाही. त्याच्या या लूकमध्ये तो खूप हँडसम आणि डॅशिंग दिसत आहे. तर त्याचा फोटो बघून त्याचे अनेक चाहते तू हिरो म्हणून काम करावं असं म्हणत आहेत.

जिब्रान खान प्रसिद्ध अभिनेता फिरोज खानचा मुलगा आहे. परंतु त्याने कधी बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी त्याच्या वडीलांचे नाव वापरले नाही. जिब्रान खानला त्याच्या मेहनतीने बॉलीवूडमध्ये नाव कमवायचे आहे.

फिरोज खान यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्यात करण अर्जुन सारख्या हिट चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटांशिवाय फिरोज खान यांनी महाभारत सिरीयलमध्ये अर्जुनच्या भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका अतिशय लोकप्रिय झाली होती.

Leave a Comment