योगयोगेश्वर जयशंकर मालिकेमध्ये बालशंकरची भूमिका साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार….

छोट्या पाड्यावर अनेक मालिका सुरु आहेत. परंतु कलर्स मराठी वाहिनीवरील  योगयोगेश्वर जयशंकर मालिका खूपच प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेला प्रेक्षक खूप आवडीने पाहतात. (The parents of the actor Arush Bedekar who played the role of Bal Shankar in the Yog yogeshwar Jaishankar serial are also actors)

योगयोगेश्वर जयशंकर ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. याचसोबत यातील अनेक कलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत. नुकताच या मालिकाच दत्तजयंतीचा विशेष भाग दाखवण्यात आला आहे. त्यात भागात बालशंकरा गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचे दाखवलं आहे. त्या दरम्यान संपूर्ण प्रेक्षक वर्ग खूपच भावुक जाळायचे  दिसत होत.

आरुष बेडेकर या बालकलाकाराने बालशंकरची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. या मालिकेमध्ये येण्यापूर्वी आरुष बेडेकर याने अनेक नाटकात काम केलं आहे. अहमदनगर हे आरुषचे मूळ गाव आहे. तर सध्या त्याचे सर्व कुटुंब अहमदनगर मधेच वास्तव्यास आहे. मात्र आरुष एका कलाकार कुटुंबातून आला आहे. आरुष याचे वडील प्रसाद बेडेकर हे शिक्षक आहेत. त्याचसोबत ते  नामवंत बेडेकर क्लासेसचे संचालक आहेत.

शिकणासोबत त्यांना अभिनयाची देखील आवड आहे. प्रसाद बेडेकर यांनी अहमदनगर येथे होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यांनी अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्याचसोबत त्यांनी वेगवेगळ्या मंचावर प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

आरुषच्या वडिलांनी अंकुश चौधरी आणि पल्लवी पाटील यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ट्रिपल सिट’ या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तर प्रसाद यांना त्यांच्या अभिनयाची छाप योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेत सुद्धा सोडली आहे. त्यांनी या मालिकेत त्याच्या मुलासोबत काम केलं आहे.

आरुषची आई अमृता बेडेकर यांना एक उत्कृष्ट गायिका म्हणून ओळख जाते. त्यांनी स्वतःची एक संगीत अकादमी सुरु केली आहे. त्याचे नाव स्वरोहम असे आहे. त्या रोज अनेक कलाकारांना संगीताचे धडे देत असतात. तसेच आरुषचे आई वडील दोघे देखील या क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांनी आरुषला देखील खूप प्रोत्साहन दिले आहे.

ज्यामुळे आरुष शाळेत असल्यापासूनच बालनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत होता. आरुषला उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. योगयोगेश्वर जय शंकर मालिकेसाठी आरुषला ऑडिशनला सामोरी जावे लागले होते. त्यानंतर त्याला मुख्य भूमिकेसाठी निवडले होते.

आरुषसोबत अनेक कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यात, उमा ऋषीकेश, अतुल आगलावे, निलेश सूर्यवंशी या कलाकारांची नावे आहेत. चिमणाजीचे पात्र साकारणाऱ्या अतुलने मालिकेला रामराम केला आहे. मात्र ही मालिका सोडताना तो खूप भावुक झाल्याचे दिसले होते.

तसेच मालिकाच हा अध्याय लवकरच संपणार आहे. यानंतर मालिकेच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी नवीन कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. सोनाली पाटील हिने काही दिवसांपूर्वीच या मालिकेत काम केलं होत. तर या मालिकेत बालशंकरच्या त्रैलोक्य भ्रमणाचा काळ सुरु झाल्यामुळे अनेक चड उत्तर पहिला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता या मालिकेबद्दल खूप उसुक्ता लागली आहे.

Leave a Comment