अरे बापरे! आता या अवस्थेत आहे आशिकी फेम ही अभिनेत्री, करावे लागत आहे हे काम…

“आशिकी”(“Aashiqui”) या चित्रपटाने ९०च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट ठरला होता.  ज्याने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Agarwal) देखील रातोरात लोकप्रिय झाले होती. तिच्या या चित्रपटामुळे तिचे लाखो चाहते झाले होते. अभिनेत्री अनुचा जन्म ११ जानेवारी १९६९ रोजे दिल्ली येथे झाला होता.

या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अनु दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी रोमँटिक चित्रपट आशिकीमध्ये महेश भट्टने अनुला कास्ट केलं होत. अनु अग्रवालने ११ जानेवारी रोजी तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला आहे.

मात्र या अभिनेत्रीचा १९९९ साली एक भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे अभिनेत्री अनुचे सगळे जीवन बदलून गेले होते.  तिच्या आयुष्यात वाईट काळाला या अपघातानंतर सुरवात झाली होती.  अनु अग्रवालने  या दुर्घटनेमध्ये तिची स्मरणशक्ती गमावली होती. त्यासोबतच ती  २९ दिवस कोमामध्ये देखील गेली होती.

या सगळ्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम अनुच्या स्मरणशक्तीवर झाला. या अपघातातून जेव्हा अनु सावरण्याचा पर्यंत करत होती. त्यावेळी तिने स्वतःसोबत झालेल्या दुर्घटना जगासमोर आणण्यासाठी एक आत्मकथा निर्णय घेत तिने आत्मकथा लिहिली होते. ती कुठे आणि कोणत्या अवस्थेत राहते हे अनेक वर्षांपासून कोणाला देखील माहीत नव्हते.

परंतु नंतर समजलं कि अनु बिहारमधील मुंगेर गावात स्टारडम आणि फिल्मी जगापासून दूर आयुष्य जगत आहे. या गावातील एका शाळेत ती मुलांना योग शिकवत आह. अशी माहिती मिळाली होती.

अनुच्या पुस्तका  प्रकाशनाच्या वेळी महेश भट्ट यांनी अनुचे कौतुक करत म्हणाले कि, ही मुलगी मृत्युच्या दारात जाऊन परत आली आहे. मात्र हैराण करणारी गोष्ट अशी आहे कि अनुने अशा कठीण परिस्थितीतून तिने तिच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. अनु अग्रवाल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले होती. जेव्हा ती २०१७ मध्ये बेगम जान या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. 

यावेळी अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते, मात्र अनु अग्रवालने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अनु अग्रवालचा लूक आणि तिची पर्सनॅलिटी खूप बद्दली आहे. अनु आता एक साधे आणि सरळ आयुष्य जगते.

Leave a Comment