खाली पहा अनुपम खेर यांचे कधी न पाहिलेले फोटो…

अनुपम खेर / Anupam Kher हे एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी सुमारे आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेले आहे. बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे.

अनुपम यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅकटर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे.

एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे.

त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.

अनुपम खेर यांचे प्रारंभिक जीवन अनुपम खेर हे मूलतः एक काश्मिरी पंडित वंशीय आहेत. अनुपम खेर यांचा जन्म शिमला येथे ७ मार्च १९५५ साली झाला.

त्याचे पिता सरकारी क्लार्क होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिमला येथे झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले.

कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्या हेतू ते मुंबईला आले. संघर्ष करताना ते बरेचदा रोड बाजूच्या प्ल्याटफार्मवरच झोपायचे त्यांच्या अशाच इच्छाशक्तीने त्यांना अभिनय क्षेत्रांच्या शिखरावर नेले.

विद्यापीठातील वार्षिक कलामहोत्सवातील त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच सर्वांचे लक्ष त्यांच्या कडे वेधले गेले. १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने त्यांचे फिल्मी करियर रुडावर आले.

१९८४ मधील “सारांश” मधील अभिनयाची खूप प्रशंसा झाली यावेळी अनुपम चांगलेच सुपरिचित झाले होते. २८ वर्षीय अनुपमने ६५ वर्षीय म्हातारयाचा रोल अत्यंत सहजतेने केला यासाठी त्यांना फिल्मफेयरचा बेस्ट परफोरमस अवार्ड मिळाला.

त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. त्यांचे हास्य अभिनेता म्हणून बरेच अभिनय लोकांच्या मनात चिरकाळ घर करून आहेत. त्यांनी विलन म्हणून “कर्मा” (१९८६) आणि डॅडी (१९८९) मधील अभिनयासाठी बेस्ट पेरफोर्मंस चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. त्यांचा सद्याचा टॉक शो –अनुपम खेर टॉक शो – कुछभी हो सकता है फारच लोकप्रिय आहे. त्यांचे सुपरस्टार शाहरुख सोबत बरेच चित्रपट आहेत.

Leave a Comment