किमी काटकरच्या मुलाला पाहिलंत का? दिसतो खूपच हँडसम, त्याच्यासमोर बॉलिवूड हिरो सुद्धा फिके पडतील…

हम चित्रपटातील जुम्मा चुम्मा गाण अजूनही सर्वांच्या ओठी रेंगाळत. हे गाण बिग बी म्हणजेच बॉलीवूड चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांनी परफॉर्म केले होते. या गाण्यातील अभिनेत्री किमीच्या हॉटनेसने सर्वांनाच भुरळ घातली होती.

या गाण्यामुळे किमी रातोरात स्टार झाली होती. पण यशाच्या शिखरावर असताना देखील किमी काटकरने बॉलिवूड इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला.

आता ती सगळा वेळ तिच्या फॅमिलीसोबत घालवते. किमीने १९९२ मध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि सिनेनिर्माता शांतनु गौरीसोबत लग्न केले.

त्यांना एक मुलगा सिद्धांतही आहे. सिद्धांत आता बराच मोठा झाला आहे. सिद्धांत हा खूप हँडसम आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले दिसून येतात.

Photo Courtesy: Google/CC

यात तो त्याची आई किमी काटकरसोबत दिसत आहे. सिद्धांत हा आई किमी प्रमाणेच दिसायला सुंदर आहे. परंतु, त्याला फिल्म इंडस्ट्रीत इंटरेस्ट नाहीये. तो वेगळ्याच क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहे.

किमी काटकरने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. ज्यामध्ये तेजा, टार्जन , धर्मयुद्ध अशा बऱ्याच चित्रपटांचा समावेश होतो. जुम्मा चुम्मा या गाण्यामुळे किमीला खूप प्रसिद्धी मिळाली.

Leave a Comment