खाली पहा दत्तू मोरेच्या घराचे कधी न पाहिलेले फोटो…

‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोने काहीच वर्षात कमालीचा प्रेक्षकवर्ग कमावला आहे.

यातील प्रत्येक कलाकारांची वेगळी ओळख आहे. ‘दत्तू मोरे’ (Dattu More) हा चेहरा देखील हास्यजत्रामधून घराघरात पोहोचली. विविध प्रहसनांमधली त्याची एंट्री असेल किंवा त्याच्या नाचाची एक हट के स्टाइल; तो त्याच्या सहज अभिनयामुळे नावाजला जातो.

प्रहसनांमध्ये कितीही अनुभवी, दिग्गज कलाकार असो; तो त्याची वेगळी छाप हमखास दाखवतोच. अशा ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण प्रसंग घडला आहे.

दत्तू राहत असलेल्या चाळीचं नामकरण झालं असून त्याला चाळकऱ्यांनी ‘दत्तू चाळ’ असं नावं दिलंय. दत्तू मूळचा ठाण्याचा. वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या साध्या चाळीत वाढलेला. त्याचा अभिनय, त्याला मिळणारी शाबासकीची थाप,

त्याची प्रगती आणि त्याच्या कामाचा चढता आलेख यामुळे दत्तूच्या चाळीला ‘दत्तू चाळ’ हे नाव देण्यात आलं आहे. ‘चाळीला कुठलंही विशिष्ट नाव नव्हतं. अनेकदा एखाद्या खुणेच्या आजूबाजूची चाळ असं सांगितलं जायचं.

आता ती चाळ माझ्या नावानं ओळखली जाणार आहे हे ऐकून खूप छान वाटतंय’, असं दत्तू म्हणाला.

हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमकडून भरपूर शिकायला मिळत असल्याचंही त्यानं सांगितलं. ‘ही बातमी टीमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला, भरून आलं होतं. ज्यांना बघत लहानाचा मोठा झालो;

त्यांनी माझं कौतुक करणं हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं’, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या. त्याच्या या यशात त्याच्या सगळ्या हितचिंतकांचा, कुटुंबाचा आणि त्याला मदत केलेल्या सगळ्यांचा सहभाग असल्याचं तो म्हणाला.

‘चाळीला आपलं नाव लागणं ही आनंददायी गोष्ट तर आहेच; पण त्यामुळे नव्या जोमानं काम करायचा हुरूप येतो आणि आधीपेक्षा अजून चांगलं काम करण्याची जिद्द मिळते.

पुढेही असंच चांगलं काम करायचा माझा प्रयत्न असेल’, असं दत्तूनं सांगितलं. कार्यक्रमासाठी पडद्यामागे काम करता करता दत्तू पडद्यावरही तितक्याच शिताफीनं काम करत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

”माझ्या चाळीतल्या बऱ्याच घरांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रसारित होत असलेली वाहिनी लागत नव्हती. पण माझं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून ते त्याला पसंती देऊ लागले; त्यानंतर चाळीतल्या सगळ्यांनी माझ्या प्रेमापोटी ती वाहिनी असलेला केबलचा पॅक विकत घेतला’, अशी प्रतिक्रिया दत्तू मोरे याने दिली आहे.

Leave a Comment