खाली पहा, हास्य जत्रा फेम ‘समीर चौगुले’ यांच्या घराचे कधी न पाहिलेले फोटो…

 

विनोदवीर ही पदवी खूप कमी लोकांना बहाल केली जाते. कारण म्हणतात ना लोकांना रडवणे सोपे आहे पण हसवण्यात खरी कसरत आहे.

 

आणि असंच लोकांना खळखळून हसवण्याचा काम एक विनोदवीर अगदी निष्ठेने करतो तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका समीर दिवाकर चौगुले. मूळचा मुंबईचा असणारा समीर स्वतःच्या परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शो मधून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

 

समीर 2002 सालापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्याचा जन्म 29 जून 1973 रोजी मुंबई येथे झाला. त्यानं त्याचं शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमधून पूर्ण केलं, त्यानंतर त्यानं त्याचे महाविद्यालयीन शिक्षण एम.एल.धानोरकर महाविद्यालयातून पूर्ण केलं आणि वाणिज्य शाखेतून आपली पदवी घेतली.

 

समीरने त्याच्या पूर्णवेळ करिअरची सुरवात 2002 पासून केली. त्याच्या शालेय जीवनात त्याला खेळाची जास्त आवड होती. तो शाळेतील खेळात सहभागी व्हायचा.

 

आधीच स्पोर्टसमनशीप असल्यामुळे समीर शाळा महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात ही सहभागी व्हायचा. अशाच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेता घेता त्याला अभिनयाची गोडी लागली. त्यानंतर समीरने अभिनयासोबत लिखाणातही सातत्य ठेवले.

 

2002 ते 2021 या कालावधीत समीरने अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलंय. समीरच्या करियरला 2005 पासून खरी सुरुवात झाली. त्याचा पहिला चित्रपट होता ‘कायद्याचं बोला’. ज्यामध्ये त्याचा अतिथी कलाकार म्हणून सहभाग होता. त्यानंतर त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावतच गेला.

 

इतकं प्रचंड काम केल्यावर समीर सध्या सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये काम करतोय. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कॉमेडी शो अनेक कारणांसाठी बघितला जातो. त्यातल एक कारण म्हणजे समीर चौगुले.

कॉमेडी टायमिंगमुळे त्याला अनेकदा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ,चार्ली चापलीन अशा लोकांच्या सोबत नाव जोडले जाण्याचा सन्मान मिळालाय. समीर उत्तम अॅक्टिंग करतोच पण त्यासोबतच तो उत्तम लिहितो सुद्धा.

समीरला त्याच्या लेखनासाठी खूप वेळा दाद मिळते. हास्यजत्रेमध्ये तो एकटा असो किंवा त्याची आणि विशाखा सुभेदारची जोडी असो स्टेजवर ते अक्षरशः धुमाकूळ घालतात. समीर आणि विशाखा अनेकदा नवरा-बायको, बॉस- एम्प्लॉयी अशा जोड्यांमध्ये दिसलेत.

Leave a Comment