खाली पहा राहुल रॉयचे आत्ताचे फोटो…

90 च्या दशकात ‘आशिकी’ (Aashiqui ) या सिनेमानंतर एकारात्रीत स्टार झालेला अभिनेता राहुल रॉयचा.

‘आशिकी’ हा सिनेमा आला आणि राहुल रॉय एकारात्रीत स्टार झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची गणितंच बदलून टाकली.

शाहरूख, सलमान, आमिरची चलती असलेल्या काळात राहुल रॉयच्या या सिनेमानं अख्ख्या तरूणाईला वेड लावलं. गाणी तर तुफान गाजलीत.

‘आशिकी’नंतर राहुल रॉय मोठा स्टार बनला. पण फार काळ नाही. होय, करिअर पीकवर असताना राहुलने बऱ्याच चुका केल्यात आणि त्याच त्याला नडल्या. कुठे नशीब आडवं आलं. राहुल रॉयला आजही त्याचा पश्चाताप होतो.

द कपिल शर्मा शोमध्ये राहुल रॉय त्याच्या करिअरबद्दल बोलला होता.‘ आशिकी सुपरडुपर हिट झाला. पण खरं सांगू या चित्रपटानंतरनंतर सहा महिने माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता.

पण त्यानंतर अचानक मला एकाचवेळी 49 चित्रपटांची ऑफर आली. यापैकी कोणता चित्रपट स्वीकारायचा आणि कोणता नाकारायचा, हेच त्याक्षणी मला कळत नव्हतं.

मला आठवतं यश चोप्रा यांनी मला पटकथा ऐकवण्यासाठी बोलावलं होतं. मी इतर चित्रपटांमध्ये प्रचंड बिझी होतो आणि माझे बरेचसे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते.

निर्माते माझ्या तारखांसाठी झगडत होते आणि त्याचमुळे मी यश चोप्रा यांची ऑफर घेऊ शकलो नाही, असं राहुलने सांगितलं होतं.

Leave a Comment