80 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री भानुप्रियाची झाली आहे अशी अवस्था, घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम…

८० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक साऊथ अभिनेत्रींनी डेब्यु केला होता. पण श्रीदेवी आणि जया प्रदाचे बॉलीवूडमध्ये राज्य होते. अशा परिस्थितीमध्ये अजून एका अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.

या अभिनेत्रीचे नाव होते भानूप्रिया. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर काही दिवसांमध्ये भानुप्रियाने खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती. त्यांना डस्की ब्युटी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांवर आणि सावळा रंगावर अनेक जण घायाळ झाले होते.

त्या काळी आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या भानुप्रियाला आज ओळखणे देखील कठीण झाले आहे. भानूप्रिया आज ५३ वर्षांच्या झाल्या आहेत. आत्ता त्यांना ओळखणे देखील खुप कठीण झाले आहे. ८० च्या दशकात त्यांच्या सुंदरतेवर घायाळ होणारे त्यांचे फॅन्स आज त्यांना ओळखू शकणार नाहीत.

भानूप्रिया हे साऊथमधील खुप मोठे नाव आहे. त्यासोबतच त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील खुप चांगले काम केले आहे. भानूप्रियाचा जन्म १५ जानेवारी १९६७ ला आंध्रप्रदेशमध्ये झाला होता. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती.

१९८३ मध्ये त्यांनी एका तामिळ चित्रपटातून अभिनयात डेब्यु केला होता. अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी साऊथमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्ये काम केले.

१९८६ मध्ये त्यांनी ‘दोस्ती दुश्मनी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. बॉलीवूडमध्ये देखील खुप कमी वेळात त्यांना यश मिळाले. त्यांनी इंसाफ की पुकार, मर मिटेंगे, तमंचा, सुर्या, गरिबों का दाता, कसम वर्दी की, जहरिले अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडमध्ये त्यांची जोडी सर्वाधिक मिथून चक्रवर्ती आणि जितेंद्रसोबत पसंत केली गेली.

भानुप्रियाची छोटी बहीण शांतीप्रिया बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण या दोघी जास्त काळ बॉलीवूडमध्ये टिकू शकल्या नाहीत. भानूप्रियाने १९९८ मध्ये विदेशी बिजनेस मॅन आदर्श कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर त्या युएसला शिफ्ट झाल्या. त्यांना एक मुलगी आहे. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. २००५ मध्ये दोघे वेगळे झाले. आज भानुप्रिया साऊथ चित्रपटांमध्ये साईड रोल करत आहेत.

Leave a Comment