खाली पहा, संजय दत्तच्या अलिशान घराचे कधी न पाहिलेले फोटो…

संजय दत्त हे एक भारतीय अभिनेता आहे. त्यांनी बालपणात 1972 मध्ये आपल्या वडिलांसोबत रेशमा और शेरा या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या छब्या उमटविले आहेत. संजय दत्त एक यशस्वी अभिनेता,

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नरगिस व अभिनेता संसदपटू सुनील दत्त यांचा मुलगा, खासदार प्रिया दत्तचा भाऊ आहे. वडिलो‍पार्जित मिळालेली प्रसिद्धी व धनदौलत मिळाल्यानंतरही हा नायक शेवटी खलनायक बनून चाहत्यांचे मनोरंजन करत राहिला. त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

संजय दत्त यांचा जन्म 29 जुलै 1959 या दिवशी झाला. त्यांचे पूर्ण नाव संजय बलराज दत्त आहे. त्यांचे वडील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुनील दत्त हे आहे.

तसेच त्यांची आई लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस आहेत. 1981 मध्ये रॉकी या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी त्यांच्या आईचे निधन झाले. नर्गिस दत्तचा कर्करोगाने मृत्यू झाला.

त्यांना दोन बहिणी आहेत. प्रिया दत्त आणि नम्रता दत्त. त्यांची बहीण प्रिया दत्त ही एक राजकारणी आहे. संजूला त्याच्या आईच्या मृत्यूने खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा आईचा मृत्यू झाला, तेव्हा संजू 22 वर्षाचा होता आणि या दुर्घटनेनंतर संजूला ड्रग्स आणि व्यसनाधीनतेचे व्यसन लागले. संजय दत्तने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक पात्र चांगले रंगवले परंतु प्रेम आणि विनोदी शैलीत तर त्यांनी यश मिळवून घेतले.

संजय दत्त याने पहिले लग्न 1987 मध्ये रिचा शर्मा हिच्यासोबत केले. मात्र लग्नाच्या नऊ वर्षानंतर रिचा शर्मा यांचे ब्रेन ट्यूमरमुळे 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र यांच्या दोघांची एक मुलगी आहे, त्रिशला ही सध्या तिच्या आजी-आजोबांकडे अमेरिकेमध्ये राहते. संजय दत्त यांनी 1998 साली मोडेल रिया पिल्लई दुसरे लग्न केले.

परंतु काही कारणांमुळे त्यांचे नातलग यशस्वी झाले नाही आणि दोघांचेही घटस्फोट झाले. यानंतर संजय दत्त हे मन्यताला भेटले. दोघेही दोन वर्ष एकसारखीच राहिले. त्यानंतर दोघांनीही गाठ बांधण्याचे ठरवले आणि गोव्यात जाऊन लग्न केले. 21ऑक्‍टोबर 2010 रोजी मान्यता दत्तने इक्रा आणि शहारन या जुळ्या मुलांना जन्म दिला.

संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांचा अभिनेता म्हणून सुरुवात चांगलीच गाजली. परंतु अंमली पदार्थांच्या आहारी गेले व अनेक वर्षे चित्रपट सृष्टीपासून दूर होते. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांची तब्येत एकेकाळी फारच खालावली होती. त्यावेळेस सुनिल दत्त यांनी त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले.

अंमली पदार्थांचे संजय दत्त यांचे व्यसन उपचारानंतर सुटले व त्यांनी काही काळ अमेरिकेत व्यतीत केला. या काळात त्यांना अमेरिकेतच रहाण्याची व चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी पासून दूर रहाण्याचे ठरवले होते. परंतु सुनिल दत्त यांनी आपल्या इच्छेखातर भारतात परतण्याची विनंती केली व त्यास संजय दत्त यांनी होकार दिला.

भारतात परतल्यानंतर काही काळानंतर पुन्हा चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक हिट चित्रपट दिले. या काळात व्यक्तीक आयुष्यात बदल झाले. तसेच 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के. 56 रायफल हस्तगत करण्यात आली.

Leave a Comment