आता या अवस्थेत आहे जुम्मा गर्ल ‘किमी काटकर’, आत्ताचे फोटो बघून बसेल धक्का…

बॉलीवुड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्री खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.  आज आपण अमिताभ यांच्या जुम्मा चुम्मा गर्लबद्दल माहिती घेणार आहोत. (Jumma Chumma Song Girl actress Kimi Katkar looks gorgeous in her 50s)

अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट, त्यातील भूमिका आणि त्यातील गाणी खूप प्रसिद्ध झाली आहेत. जुम्मा चुम्मा दे दे हे गाणं अश्यातीलच एक आहे. या गाण्याने अनेकांना वेड लावलं होत. तर आज देखील या गाण्याला नेटकरी पसंती देत आहेत. १९९१ साली आलेला हम या चित्रपटातील हे गाणं आहे.

हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं होत. तसेच यातील अमिताभ यांच्या डान्स स्टेप्स खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या. अमिताभ यांच्यासोबत या गाण्यामध्ये अभिनेत्री किमी काटकर देखील दिसली होती. या अभिनेत्रीने या गाण्यामध्ये लाल रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला होता. हे गाणं  त्या काळातील सर्वात लोकप्रिय गाणे मानले जात होते.

अभिनेत्री किमी काटकर एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिने तिच्या अभिनयाने खूप मोठा चाहता वर्ग तयार केला होता. मात्र ही अभिनेत्री सध्या कुठे आहे? काय करते? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत आहे. त्यामुळे आज आपण या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री किमीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोतील किमीला पाहून तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. पहिल्यापेक्षा किमीमध्ये खूप बद्दल झाल्याचे दिसत आहे. वयामुळे तिचे सौंदर्य कमी झाले. मात्र हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही बदलत असते. परंतु आजही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे सौंदर्य वयासोबत वाढत आहे. परंतु किमची सुंदरता नक्कीच थोडी कमी झाली आहे.

मात्र अभिनेत्रींचे स्मित हास्य आज देखील लोकांना घायाळ करत आहे. किमी जुम्मा चुम्मा गर्ल या नावाने सर्वत्र ओळखली जात होती. तसेच ही अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. जुम्मा चुम्मा या गाण्यामुळे किमी खूप प्रसिद्ध झाली होती.  रातोरात या गाण्याने तिला प्रसिद्ध केलं होत.

याआधी किमीला टारझन गर्ल या नावाने ओळखलं जात होत. १९८५ साली आलेला टारझन या चित्रपटामध्ये तिने उत्तम भूमिका साकारली होती. ज्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटात किमीने बरेच न्यूड सीन्स दिले होते. या चित्रपटानंतर तिला सिम्बलवर प्रसिद्धी मिळाली. हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये किमीचे नाव जोडले गेले होते.

किमीचा जन्म ११ डिसेंबर १९६५ ला मुंबई येथे झाला होता. किमीने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला होता. तिचा पहिला चित्रपट होता पत्थर दिल. परंतु तिचा हा चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर तीने ‘टारझन’ या आणखी एका चित्रपटात काम केलं होत. या चित्रपटात तिने तिच्या ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मानत तिचे वेगळं स्थान निर्माण केलं होत.

किमीने जितेंद्र, अनिल कपूर आणि गोविंदा यांसारख्या काही मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिने गोविंदासोबत अनेक चित्रपट केले आहेत. किमी आणि गोविंदा एकत्र खूप छान दिसतात. मात्र अचानक कीमीने बॉलीवूड पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. सलग अयशस्वी चित्रपटांमुळे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पुण्यामधील फोटोग्राफर आणि ॲड फिल्म निर्देशक शांतनु शोरे याच्यासोबत अभिनेत्री किमीने लग्न केलं आहे. मात्र सध्या किमीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमानात व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये किमीच्या बदलेल्या लुकमुळे तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

Leave a Comment