बॉलिवूड अभिनेता सलमान खानच जमलं लग्न? ही अभिनेत्री होणार त्याची पत्नी…

बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. तसेच त्याला दबंग म्हणून देखील एक ओळख त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. मात्र याच अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.  (Rumors  spread on social media that actor Salman Khan and actress Karishma Kapoor are going to get married)

सलमान खान हा बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयामुळे आणि पर्सनॅलिटीमुळे खूप प्रसिद्ध आहे. त्याने आता वयाचे ५८ गाठले आहे. मात्र तो अजून देखील बॅचलरच आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक बिलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होत. मात्र अद्यापि त्याने लग्न केलं नाही.

सध्या सोशल मीडियावर सलमानच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. अभिनेत्याचा ‘किसी का भाई किसी कि जान हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. मात्र सर्वत्र अश्या चर्चाना उधाण आलं आहे कि, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमान लग्न करणार आहे. ज्या अभिनेत्रीसोबत तो लग्न करणार आहे ती अभिनेत्री देखील बॉलिवूडमधली आहे.

कपूर घराण्यासोबत त्या बॉलिवूड अभिनेत्री संबंध असल्याचे बोललं जात आहे. ती अभिनेत्री करिष्मा कपूर असल्याचे समजलं आहे. करिष्मा कपूरने वयाच्या १७व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने ९०च्या दशकात सगळ्यांची मन जिंकली होती.

यानंतर बॉलिवूडमध्ये करिष्माने तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र तिचे खजगी आयुष्य फार चांगले झाले नाही. तिच्या लगाच्या काही वर्षानंतर तिने तिच्या पतीपासून घटस्फोस्ट घेतला होता. त्यानंतर ती सिंगल मदर असल्याचे दिसते. मात्र ती लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्री करिष्मा कपूर आणि सलमान खानच्या लग्नाच्या बातम्या पसरत आहेत. लवकर हे जोडपं लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. तसेच सलमान करिष्मा यांच्यातील केमिस्ट्रीची देखील चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, सलमानची बहीण अर्पिताच्या घरी ईद पार्टी होती. त्यावेळी सलमान आणि करिश्माचा वेगळीच बॉन्डिंग सगळ्यांसमोर आली होती.

त्यामुळे सगळे हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावत आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे.  दरम्यान अभिनेत्री करिश्माने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्या फोटोमध्ये तिने  सलमान खानला घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

या फोटोवर नेटकरी “दोघे एकत्र छान दिसता दोघे लग्नच करा’ अश्या कमेंट येत आहेत. त्यामुळे या बातम्या कितपत खर्‍या आहेत किंवा त्यातील सत्य काय आहे हे येत्या काही वर्षात समजेल. तसेच सोशल मीडियावर कधी कोणत्या अफवा किंवा बातम्या पसरतील हे सांगता येत नाही.

सलमान खानला एका चाहत्याने कमेंट केली आहे कि, ‘सलमान सर प्लीज करिश्माशी लग्न करा, तुम्ही दोघंही खूप छान दिसता’

Leave a Comment