खाली पहा फोटो विराट कोहलीचे अलिबाग मधील आलिशान फार्म हाऊस…

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अलिबागमध्ये आठ एकर जागा खरेदी केली होती.

विराटने ही जमीन एकूण १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केली होती. या जागेसाठी त्याने १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली होती.

त्यादरम्यान आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत असलेल्या विराटसाठी त्याच्या भावाने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे हा व्यवहार पूर्ण केला होता.

विराट अलिबागमधील या हवेशीर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे. विराट-अनुष्काच्या अलिबागमधील घराची झलक आता समोर आली आहे.

विराट-अनुष्का अलिबागमधील आवास गावात खरेदी केलेल्या जागेवर चार बीएचके फार्महाऊस बांधणार आहेत. ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार,

चार बीएचके फार्महाऊस बांधण्यासाठी १०.५ ते १३ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. विरुष्काचं अलिबागमधील फार्म हाऊस ‘आवास वेलनेस’ या फर्मकडून डिझाइन करण्यात येणार आहे.

Leave a Comment