पहा पुण्यातील डोणजे मध्ये असलेले नाना पाटेकर यांच्या ‘फार्म हाऊस’ चे फोटो…

अभिनेत्री तनुश्री दत्ताने सेक्शुअल हरॅसमेंट आणि मारहाणीचा आरोप लावल्यामुळे नाना पाटेकर वादात अडकलेहोते. 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ मधून डेब्यू करणा-या नाना पाटेकर यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास 4 दशक झाले आहेत.

या दरम्यान नानांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. वेबसाइट नेटवर्दियरच्यारिपोर्टनुसार, नाना जवळपास 10 मिलियन डॉलर (72 कोटी) प्रॉपर्टीचे मालक आहेत.

यामध्ये त्याचा फॉर्महाउस, कार आणि दूस-या संपत्तीचाही समावेश आहे. एवढे असूनही नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात.

नाना पाटेकरांजवळ पुण्याच्या जवळ खडकवासलामध्ये 25 एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाउस आहे. शहराच्या गर्दीपासून दूर नानांना जेव्हा रिलॅक्स करायचे असते, तेव्हा ते तेथे जातात.

डायरेक्टर संगीत सिवान यांच्या 2008 मध्ये आलेल्या ‘एक : द पावर ऑफ वन’ची शूटिंगही नानाच्या याच फॉर्महाउसमधून झाली होती.

नानांनी आपल्या या फार्महाउसजवळ धान्य, गहू आणि हरब-याची शेतीही करतात. नाना पाटेकरांच्या या फार्महाउसमध्ये 7 खोल्यासोबतच एक मोठा हॉल आहे.

नाना पाटेकर फार्म हाऊस

यामध्ये नानांच्या आवडीनुसार, सिंपल वुडन फर्नीचर आणि टेराकोटा फ्लोर आहे. नानांनी आपले घर आपल्या गरजेनुसार सजवले आहेत.

यासोबतच घराजवळ अनेक प्रकारचे झाडं-झुडपंही लावण्यात आली आहेत. फार्महाउसमध्ये मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.

टाइम्स नाऊ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, नाना पाटेकरांजवळ 81 लाख रुपयांची ऑडी Q7 कार आहे. यासोबतच त्यांच्याजवळ एक 10 लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि 1.5 लाख किंमतीची रॉयल इनफील्ड क्लासिक 350 आहे.

Leave a Comment