खाली बघा फोटो, अमिताभ बच्चन यांचे पुण्यातील आलिशान फार्म हाऊस…

अमिताभ बच्चन एक असं नाव चे भारताचा सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. जे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. आज आपण अमिताभ बच्चन यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

त्यांचे लहानपण, त्यांची शाळा, कॉलेज, शिक्षण, सिनेमा करियर, प्रेम संबंध आणि त्यांचं कुटुंब याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अमिताभ बच्चन यांच्या जीवनाविषयी पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख कृपया पूर्ण वाचावा.

अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्ठीतील एक विख्यात सुपरस्टार कलाकार आहेत.  त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची  सुरुवात सात हिंदुस्तानी नावाच्या चित्रपटाने केली.  त्यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटात काम केले पण 1973 साली  प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले.
त्यानंतर त्यांचे दिवार, शोले असे बरेच चित्रपट गाजले १९८० च्या  दशकामध्ये ते खासदार पण होते. त्यांनी अमिताभ बच्चन कार्पोरेशन नावाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुद्धा  काढली होती पण त्यात त्यांना खूप नुकसान झाल्यामुळे ती बंद करावी लागली.
त्यानंतर काही काळ ते चित्रपट जगतापासून दूर राहिले.  १९९७ मध्ये  प्रदर्शित झालेल्या मृत्युदाता या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट जगतात पुन्हा पदार्पण केले.  २००० साली  त्यांना कोन  बनेगा करोडपती या टीव्ही शोमध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली ज्यामुळे त्यांचा पूर्ण जीवनच बदलून गेलं.
त्यांच्याद्वारे निवेदित केला जाणारा कोण बनेगा करोडपती हा टीव्ही शो आजही भारतात लोकप्रिय आहे.
अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेश मधल्या अलाहाबाद येथे झाला.  त्या वेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होतं.  जन्मावेळी त्यांचं नाव इंकीलाब श्रीवास्तव असे  होते.   सुरुवातीच्या काळात चित्रपट जगतात ते एक उदयोन्मुख अभिनेते  म्हणून ओळखले जायचे.
 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले.  त्यानंतर सुपरहिट झालेल्या दिवार आणि शोले या चित्रपटांनी त्यांना यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले.  1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहेनशहा या चित्रपटाने चित्रपट सृष्टीत त्यांना एक नवीन नाव मिळाले आणि ते शहेनशहा या  नावाने ओळखले जाऊ लागले.
 शहेनशहा या नावाच्या व्यतिरिक्त त्यांची आणखी ही काही लोकप्रिय नावे आहेत जसे की अँग्री यंग मॅन, बिग बी, महानायक इत्यादी.  त्यांनी जवळजवळ दोनशेच्यावर चित्रपटांमध्ये भूमिका बजावली आहे.  भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते.
त्यांनी जवळ जवळ पाच दशकाहून अधिक काळ चित्रपट जगतात आपले  योगदान दिले आहे.  त्यांची जबरदस्त संवादफेक आणि अभिनय यांच्या जोरावर ते भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये सुपरस्टार होते.

Leave a Comment