खाली पहा फोटो, आता या अवस्थेत आहे संजय नार्वेकर, ओळखण सुद्धा झालं कठीण…

संजय नार्वेकर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. संजय नार्वेकर यांच्या नव्या सिनेमाची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. संजय नार्वेकर आता हिंदी मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘गुम है किसीके प्यार में’ या लोकप्रिय मालिकेत संजय नार्वेकर अभिनय करणार आहेत. यानिमिताने संजय नार्वेकर पहिल्यांदाच हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहेत.

‘गुम है किसी के प्यार में’ मालिका 2020 पासून प्रसारित होत आहे. या मालिकेत संजय नार्वेकर कमल जोशी ही भूमिका साकारत आहेत. कमल हे सईचे वडिल असतात. संजय नार्वेकर हे यानिमित्ताने पहिल्यांदाच हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहेत.

संजय नार्वेकर साकारत असलेल्या कमल जोशी या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, कमल हा दोन भूमिकांमध्ये विभागलेला आहे. एक वडिलांची आणि दुसरी इन्स्पेक्टरची. सईला आई नाही आणि कमल तिच्यासाठी वडील आणि आई अशी दुहेरी भूमिका साकारत आहेत.

हे पात्र कठोर आहे पण त्याचे आपल्या मुलीवरचे प्रेम त्याला खूप भावूक करते. कमल हे सईला ‘माझी आई’ म्हणून संबोधतात आणि ती त्यांना ‘आबा’ म्हणते. बाप आणि मुलीमधले अतिशय सुरेख बंध या निमित्ताने रेखाटण्यात आल्याचे संजय नार्वेकर म्हणाले.

संजय नार्वेकरांनी आजवर त्यांच्या विविध भूमिकांनी भारतीय सिनेसृष्टीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यांनी वास्तव सिनेमात साकारलेला ‘देढफुट्या’ च्या भूमिकेचे आजही प्रचंड चाहते आहेत. अलीकडेच संजय नार्वेकर ‘टाईमपास ३’ सिनेमात हृताच्या वडिलांच्या भूमिकेत दिसलेले. या कॉमेडी भूमिकेची खूप चर्चा झाली

Leave a Comment