“गीत” चित्रपटात नायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची झाली अशी अवस्था, जाणून बसेल धक्का…

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अनेक नवीन चेहरे आले होते. त्यातल्या काही कलाकारांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलेच नाव कमवले. आजही ते कलाकार बॉलीवूडमध्ये काम करत आहेत.

पण काही कलाकार मात्र वेळेनूसार इंडस्ट्रीतून गायब झाले होते. असेच एक कलाकार म्हणजे अविनाश वादवंग. त्यांनी ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याकाळी ते खुप प्रसिद्ध होते. पण काही काळाने ते इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यांना खुप कमी चित्रपट मिळू लागले.

९० च्या दशकात अविनाश सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचे लाखो चाहते होते. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत हिट चित्रपटांमध्ये काम केले.

पण तरीही त्यांचे स्टारडम जास्त काळ टिकू शकले नाही. अविनाशने फुल बने पत्थर, परवाने, धनवान, शक्तिशाली, आवारापन,पोलीस और मुर्जिम, मीरा का मोहन, आवाज दे कहॉं है, पुकार, रंग अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी करिश्मा कपूर, दिव्या भारती, काजोल, रवीना टंडन अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केले. अविनाशने दिव्या भारतीसोबत ‘गीत’ चित्रपटामध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. चित्रपटातील गाणी आजही हिट आहेत. त्यासोबतच त्याने पुजा भट्टसोबत ‘जुनून’ चित्रपटामध्ये काम केले होते.

तर करिश्मा कपूरसोबत ‘पापी गुडीया’ चित्रपटात काम केले. अविनाश वादवंगने बॉलीवूडचे सुपरस्टार अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल की बाजी’ चित्रपटामध्ये त्यांनी अक्षयसोबत काम केले होते. अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

पण त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. त्यामूळे त्यांना काही काळानंतर चित्रपटांच्या ऑफर मिळणे बंद झाले होते. या कारणामूळे ते लाइमलाईटपासून लांब गेले होते. काही वर्षांनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केला. या वेळेस त्यांनी टेलिव्हिजनवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये मिळाले. त्यांनी बालिका वधू, क्राईम पेट्रोल, सीआयडी अशा मालिकांमध्ये काम मिळाले. त्यांनी देखील या संधीचा फायदा घेतला.

टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला होता. सध्या ते त्यांच्या कमबॅकची तयारी करत आहेत. पण हे कमबॅक वेबसीरीजच्या माध्यमातून होणार आहे. लवकरच त्यांनी वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment