गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री, सांगितले का घेतला हा निर्णय

बॉलीवुडची आणखी एक अभिनेत्री अभिनयासह तिच्या हटके कामामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव आहे जुही चावला. गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही मोबाईल टॉवर्समधून निघणा-या धोकादायक लहरींविरोधात जनजागृती करत आहे.

याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सेंद्रीय शेती करत आहे.

याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत आहे. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली.

पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते. जुहीचे वडील शेतकरी होते. त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली.

मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मात्र वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.

एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं. त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते.

Leave a Comment