अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर, ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत…

मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेता मकरंद आनासपुरेला आज सगळेच ओळखतात, आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि विनोदी स्वभावाने ते कायमच प्रेक्षकांना खेळवून ठेवतात.

अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. मकरंद अनासपुरे याचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येने आहे.

मकरंद अनासपुरे सोशल मीडियावर सुद्धा बऱ्यापैकी सक्रिय आहेत, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते वेळात वेळ काढून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

मकरंद अनासपुरे यांच्या कामाबद्दल सर्वानाच माहीत आहे परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांची पत्नी सुद्धा त्यांच्याच प्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे.

मकरंद अनासपुरे यांची पत्नी मराठमोळी अभिनेत्री आहे आणि मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे असं आहे. मात्र गेल्या काही काळापासून शिल्पा अनासपुरे अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेम विवाह आहे. अभिनेत्री शिल्पा यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर २००० साली त्यांनी ‘जाऊ बाई जोरात’ या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांची पहिल्यांदा भेट झाली होती आणि हळूहळू या दोघांची घट्ट मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मकरंद अनासपुरे यांनी शिल्पा यांना लग्नासाठी विचारलं.

मकरंद अनासपुरे यांचं लग्न ३० नोव्हेंबर २००१ मध्ये औरंगाबादमध्ये झालं. आता मकरंद अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

आता पर्यंत मकरंद अनासपुरे आणि शिल्पा दोघांनी मिळून तब्बल ५ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एवढंच नाहीतर मकरंद अनासपुरे आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं नाम फाउंडेशन मध्ये सुद्धा शिल्पा यांचा मोलाचा वाट आहे.

Leave a Comment