मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने पत्नी तृप्ती बद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला कि, आम्हाला मुली होण्याअगोदरच….

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या कॉमेडी अभिनयाने प्रेक्षकांची मंन जिंकली आहेत. त्यानी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे.  (Marathi actor Siddharth Jadhav made a big revelation about his wife Tripti)

सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनयाची छाप मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सोडली आहे. त्याच्या अभिनयाने त्याने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. हा अभिनेता सतत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तर काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या पत्नीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.

तृप्ती जाधव असे सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचे नाव आहे. मात्र सोशल मीडियावरून तृप्तीने सिद्धार्थचे नाव काढलं आहे. त्यामुळे तृप्ती आणि सिद्धार्थ घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चेमुळे सिध्दार्थने त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावेळी तो म्हणाला कि, आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये  सिद्धार्थने त्याच्या पत्नीबद्दल सांगितलं आहे.

तृप्तीने पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्याचसोबत ती आता स्वतःचा व्यावसाय करत आहे. तिने स्वतःचा स्वira या नावाचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. यासगळ्यामुळे तृप्ती संसाराला तिचा हातभार लावत आहे.

सिध्दार्थची बालभारती हा चित्रपट २ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत दिसला आहे. यानंतर तो सर्कस या बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील झळकाकणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपटांच्या प्रमोशन साठी त्यांनी मीडियाला मुलाखात दिली होती. तेव्हा त्यानी त्याच्या पत्नीबद्दल सांगितलं होत.

सिद्धार्थ म्हणाला कि,”आम्हाला मुलं होण्यापूर्वीच तृप्तींनी आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं ठरवलं. तृप्तीही पत्रकार होती, पण संसाराच्या व्यापात, मुलींच्या संगोपनाच्या जबाबदारीमुळे तिचे याकडे दुर्लक्ष झाले. मी दूर असताना माझ्या दोन्ही मुलींच्या अभ्यासाची जबाबदारी तिने घेतली. त्यांना चांगले शिक्षण द्यायचे तिने आधीच ठरवले होते.”

“त्यामुळे आमच्या दोन्ही मुली स्वरा आणि इरा बॉम्बे स्कॉटिश कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकत आहेत. तृप्ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे. आमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ती घेत आहे. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा सर्व खर्च तृप्ती स्वतः करत आहे. तिने घेतलेला हा निर्णय योग्य आहे, मी फक्त तिच्या निर्णयाला हो म्हणालो. कारण तिचे निर्णय कधीच चुकीचे नसतात.”

सिद्धार्थच्या या बोलण्यावरून या दोघांच्या नात्यामध्ये सगळं काही ठीक असल्याचे समजत आहे. या दोघांनी लव्ह मॅरेज केलं आहे. तृप्ती पत्रकारितेची पदवी घेत असताना तिने राम भरोसे या नाटकासाठी ऑडिशन दिली. तिथे दोघांची ओळख झाली. त्यावेळी पासून सिध्दार्थला तृप्ती आवडू लागली होती. परंतु तृप्ती काही कारणांमुळे हे नाटक करणार नव्हती. मात्र सिध्दार्थला हे समजल्यानंतर त्याने तृप्तीला स्टेजवर जाऊन प्रपोज केले होते.

परंतु तृप्तीला  सिध्दार्थने केलेला हा प्रकार अजिबात आवडला नव्हता. मात्र यानंतर ते चांगले मित्र राहिले होते. पुढे जाऊन त्याच्या या दोन तीन वर्षांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केलं. आता ते दोघे खूप आनंदी आहेत. त्यांना २ मुली आहेत. मात्र तृप्तीने सोशल मीडियावरून जाधव हे आडनाव काढून टाकलं आहे.  त्यामुळे यांच्यात सर्व काही ठीक नसल्यचे बोलले जात आहे.

Leave a Comment