अशोक सराफांनी या कारणामुळे गेली ४८ वर्षांपासून मित्राने दिलेली अंगठी बोटातुन कधीच काढली नाही; कारण जाणून व्हाल थक्क…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनेता अशोक सराफ यांचे नाव खूप आदराने घेतलं जात. त्यांच्या अभिनयाने त्यांनी मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. (Due to this reason, from last 48 years Ashok Saraf has never removed the ring given by his friend his finger)

अभिनेते अशोक सराफ यांना अभिनयाचे सम्राट म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिका खूप उत्तम रित्या साकारल्या आहेत. मग त्यांची  विनोदी भूमिका असो वा खलनायकाच्या भूमिका सर्व हिट झाल्या आहेत.  अष्टपैलू व्यक्तिमत्व असे देखील त्यांना उपमा दिली जाते.

अशोक मामा या नावाने त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जाते. अनेक जण त्यांच्या  अभिनयाचे कौतुक करत थकत नाहीत. अशोक यांनी मराठी सृष्टीच्या पडत्या काळामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. अशोक यांच्या हातात नेहमी एक अंगठी दिसते. त्या अंगठीचे  रहस्य अनेकांना माहिती नाही.  गेल्या ४८ वर्षांपासून अशोक सराफ यांच्या हातात ती अंगठी आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी अंगठीचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता.

विजय लवेकर यांनी अशोक सराफ यांना ही अंगठी १९७४ साली दिली होती. चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तम मेकअपआर्टिस्ट म्हणून विजय लवेकर यांनी ओळखले जात होते. त्याचसोबत त्यांचे एक छोटस सोनाराचं दुकान देखील होत. तर एकदा विजय लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या आणल्या होत्या. तेव्हा त्या बॉक्समधील एक अंगठी त्यांनी अशोक यांना निवडायला सांगितली होती.  तेव्हा अशोक यांनी कोणताच विचार न करता एक अंगठी निवडली होती.

त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा होती.  ती अंगठी अशोक सराफ यांच्या बोटात बसली होती. त्यांनी ती अंगठी खूप आवडली देखील होती. त्यावेळी अशोक म्हणाले, ही अंगठी माझी. ती अंगठी त्यांनी तशीच बोटामध्ये  घातली होती. मात्र त्या तीन दिवसांनंतर त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होऊ लागल्या होत्या. अशोक यांना पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर आली होती. त्यानंतर देखील त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यानंतर अंगठी बोटातून काढायची नाही असा निर्णय अशोक यांनी घेतला होता.

या खास किस्स्यानंतर अशोक सराफ यांनी त्यांच्या लग्नामधील सोन्याच्या अंगठीचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी ते म्हणाले कि, लग्नामध्ये  निवेदिता जोशी यांनी अशोक सराफ यांना सोन्याची अंगठी दिली होती. परंतु काही दिवसमध्ये ती अंगठी हरवली होती. किस्सा सांगत अशोक मधेच म्हणले कि, मात्र ही अंगठी मी  गेल्या ४८ वर्षांपासून माझ्याकडे जपून ठेवली आहे .

पुढे त्यांनी सांगितलं कि, ही आंगठी त्यांनी कधीच हातातून काढली नाही. मात्र एका चित्रपटासाठी त्यांना भिकारीची भूमिका करायची होती. तेव्हा त्यांना ही अंगठी काढावी लागणार होती. मात्र तेव्हा अशोक यांनी एक युक्ती लढवली कि, नटराजाची प्रतिमा असलेला ठळक भाग लपवण्यासाठी त्यांनी तळहाताकडेती अंगठी फिरवली होती. ज्यामुळे अंगठी झाकून गेली होती आणि त्याच्या अंगठीचा फक्त वरचा भाग दिसत होता. त्यामुळे दिग्दर्शकाचा अडथळा दूर झाला होता.

Leave a Comment