घटस्फोटानंतर हिंदू परंपरेनं केली अभिनेता अमीर खान आणि एक्स पत्नी किरण रावने सोबत पूजा; फोटो झाले व्हायरल…

अभिनेता अमीर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. त्याच्या अभिनयाने त्याने अनेकांच्या मानत घर केलं आहे. तसेच हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. (Actor Aamir Khan did pooja with Kiran Rao according to Hindu tradition, photo goes viral)

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अमीर खानने त्याच्या अभिनयाने अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मध्यंतरी या अभिनेत्याची त्याच्या घटस्फ़ोटामुळे खूप खूप चर्चा रंगत होत्या. तर आता नुकताच तो आणि त्याची पत्नी किरण राव पुन्हा एकद चर्चेत आले आहेत. घटस्फोटनंतर आमिर खान प्रॉडक्शनच्या होऊसची हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी एकत्र पूजा केली आहे.

ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आरती करतानाचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  हे फोटो दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल आहेत. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित केला होता. या फोटोमध्ये दिसत आहे कि, आमिरने स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. त्याचसोबत त्याने गळ्यात उपरण आणि टोपी घातली आहे.

तर एका दुसऱ्या फोटोमध्ये आमिर कलश पूजा केल्याचे दिसत आहे. या सगळ्या फोटोंमध्ये अमीर सोबत त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव दिसत आहे. ती देखील अमीर सोबत पूजा करत आहे. फोटोमध्ये किरणने डेनिम आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. तर दुसऱ्या दोनी फोटोमध्ये तिने तिच्या हातामध्ये आरतीचे ताट घेतलं आहे.

आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसच्या पूजे दरम्यानचे हे फोटो अद्वैत चंदनने शेअर केले आहेत. तर शेअर करत ही पूजा कोणत्या कारणांसाठी करण्यात आली याचे देखील कारण त्यांनी फोटो पोस्ट करत सांगितलं आहे. मात्र हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसेच या फोटोमध्ये सगळे आनंदी असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आमिरने अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं सांगितले होते. असे सांगत तो म्हणाला होता कि, पुढली दीड ते दोन वर्षा तो अभिनयापासून लांब राहणार आहे. तोवर तो त्याचा कल निर्माती कडे वळवणार असल्याचे त्याने सांगितलं होत.

दरम्यान लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला आहे. मात्र हे दोघे मिळून त्यांच्या ११ वर्षीय मुलगा आझाद राव खान याचा सांभाळ करत आहेत. किरण आणि अमीर अनेक चित्रपट पार्ट्या, विमानतळ किंवा  कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असतात.

Leave a Comment