बिग बॉस मधल्या शिव ठाकरे साठी केली रोडीज फेम रणविजयने एक खास पोस्ट; म्हणाला, एकेकाळी तू माझ्या….

बिग बॉस १६ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला आहे. प्रेक्षक हा कर्यक्रम आवडीने बघत आहेत. त्यातील अनेक सदस्य चर्चेचा विषेय ठरत असतात. अश्यातच शिव ठाकरे खूप लोकप्रिय झाला आहे. (A special post by  Roadies fame Ranvijay for Shiv Thackeray in Bigg Boss)

बिग बॉस १६ मधला स्पर्धक शिव ठाकरे त्याच्या खेळीमुळे खूप चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरत झालेल्या एक टास्कवरून त्याची खूप चर्चा होत आहे. तसेच बिग बॉसमध्ये आल्यापासून आणि येण्यापूर्वी पासूनच शिव खूप प्रसिद्ध आहे. त्याचे लोखांच्या संख्यात चाहते आहेत.

बिग बॉस १६ स्पर्धेचा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार अशी शिवाची ओळख झाली आहे. मात्र बिग बॉस १६ घरात एका नुकत्याच झालेल्या टास्कमुळे शिव चर्चेत आला आहे. यावेळी  शिवची वेगळी बाजू पाहायला मिळाली होती. चक्क या टास्कमध्ये शिव ठाकरे रडला होता. त्यामुळे शिव ठाकरेसाठी रोडीज फेम रणविजयने खास पोस्ट केली आहे.

बिग बॉस १६च्या घरात जिद्दीने आणि खंबीरपणे खेळ खेळणारा त्याच बरोबर मित्रांच्या बाजूने नेहमी उभा राहणार शिव एका टास्कमध्ये खूप भावुक झाला. भावना व्यक्त करणारा एक टास्क बिग बॉसमधील घरातील सदस्यांना देण्यात आला होता. त्यावेळी शिव भावना व्यक्त करताना प्रचंड भावुक झाल्याचे दिसले होते.

त्यानंतर सोशल मीडियावर शीवच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी शिवला पाठिंबा देण्यासाठी रोडीज फेम रणविजयने पोस्ट केली आहे. पोस्ट करत त्याने शिव आणि रणविजयच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पोस्ट करत रणविजयने लिहलं कि, “एकेकाळी तू माझ्या टीममध्ये होतास शिव ठाकरे. ही पोस्ट त्यांच्यासाठी ज्यांना माहीत नाही की मी शिव ठाकरेला कसा ओळखतो. ‘रोडीज’च्या वेळी तो माझ्या टीममध्ये होता. त्या संपूर्ण प्रवासात आम्ही वेगवेगळ्या चढ-उतारांना एकत्र समोरे गेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मात्र नेहमीच हसत असायचा. तो खूपच समजूतदार आणि कष्टाळू आहे. तो सर्वांची काळजी घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा आहे. मी त्याला सर्वच गोष्टींसाठी शुभेच्छा देतो.”

शिव ठाकरेने बिग बॉस१६ मध्ये याच्या आधी रोडीज आणि बिग बॉस मराठी हे दोनी खेळ जिंकले आहेत. तसेच प्रेक्षकांना शिव ठाकरेचा बिग बॉस १६मधला  खेळ देखील खूप आवडत आहे.

शिवला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर रणविजयच्या आधी त्याची एक्स गर्लफ्रेंड विणा जगतापने पोस्ट शेअर केली होती. तिने लिहले कि, “वाघ आहेस तू, अजिबात रडायचं नाही.” अशी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विणा जगतापने  शिवला पाठिंबा दिला आहे.

Leave a Comment