त्या वेळेस दिशा वकानी म्हणजेच ‘दया भाभी’ एक रुपया न घेता करत होती ते काम, अनेक वर्षांनी समोर आले सत्य…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो तारक मेहता का उलट चष्मा हा शो गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची एक वेगळीच लोकप्रियता आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय बनलं आहे. या शोचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे.(Tarak Mehta fame Dayaben aka Disha Vakani used to work without remuneration)

या शोसोबत यातील सर्व  पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशीच या शोमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी दयाबेन तिच्या दमदार अभिनयामुळें खूप लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री दिशा वाकानीने दयाबेनचे पात्र उत्तमरीत्या साकारले आहे.

या शोमुळे आणि दयाबेनच्या पत्रामुळे दिशा वाकानी खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या अभिनयाने तिने खूप मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. मात्र दिशा वाकानीने या शोला रामराम केला आहे. परंतु तरी तिचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

दिशाने २०१७ मध्ये तिच्या गरोदरपणामुळे या शोमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा तिने मे महिन्यात तिच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर ती पुन्हा शोमध्ये दिसली होती. मात्र तिने २०१९ रोजी हा शो कायमचा सोडला आहे. मात्र तिचे चाहते अजून सुद्धा तिला दयाबेनच्या भूमिकेत बघण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

मनोरंजन विश्वामध्ये दिशाने तिची एक खास ओळख निर्माण केली आहे. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे कि दिशा एके काळी इडंस्ट्रीमध्ये कामाचे पैसे न घेता काम करत होती. तिच्या स्ट्रगलिगच्या दिवसात जेव्हा तिने तिच्या करिअरला सुरुवात केली तेव्हा दिशा वाकानी  तिच्या कामाचे मानधन घेत नव्हती.

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिशा झळकली आहे. त्याचसबत तिने अनेक गुजराती चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळण्यासाठी जेव्हा मुंबईमध्ये आली तेव्हा या अभिनेत्री खूप कष्ट केले व अनेक वेळा मानधन न घेता काम केलं आहे. मात्र सध्या आता दिशा तिच्या कुटुंबामध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment