तारक मेहता फेम बबिता उर्फ मुनमुन दत्ता जगते आलिशान आयुष्य; जाणून तुम्हीही व्हाल थक्क…

तारक मेहता का उलट चष्मा ही मालिका टीव्ही वरील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अनेकांना वेड लावलं आहे. तसेच प्रेक्षक ही मालिका खुप आवडीने बघतात. या मालिकेसोबत यातील अनेक कलाकार लोकप्रिय झाले आहेत. (Tarak Mehta fame Babita aka Munmun Dutta lives a luxurious life)

तब्बल १४ वर्षांपासून तारक मेहता का उलट चष्मा ही मालिका प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहे. मालिकेसोबत यातील अनेक पात्र खूपच प्रसिद्ध झाले आहेत. सर्व पात्रांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच या मालिकेमधली बबिताचे पात्र खूप प्रसिद्ध झाली आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ता असे बबिताचे खरे नाव आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे. तसेच ही अभिनेत्री या मालिकेमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमुळे  अभिनेत्रीची चित्रपट विश्वामध्ये ओळख निर्माण झाली आहे. तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने तिने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे मुनमुनने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे. २००८ साली पासून मुनमुन बबिताचे पात्र साकारत आहे.  एका बंगाली महिलेचे पात्र अभिनेत्री या मालिकेमध्ये साकारल आहे.

तिच्या वास्तविक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, मुनमुन दत्ताचा जन्म दुर्गापूर बंगालमध्ये २८ सप्टेंबर १९८७ रोजी झाला आहे. ती तिच्या लहानपणापासूनच खूप सुंदर दिसते. अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अभिनेत्री एका गायक कुटुंबामधून आली आहे. तिचे वडील एक उत्कृष्ठ गायक होते. परंतु तिच्या वडिलांचे निधन २०१८ मध्ये झाले. त्यामुळे सध्या ती तिच्या आईसोबत मुंबईमध्ये राहते. तर लहानपणापासूनच मुनमुन दत्ताला अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवायचे होते. त्यामुळे तिने तिच्या कॉलेज दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.

त्यानंतरच तिला तिचा पहिला ब्रेक २००४ साली मिळाला होता. परंतु यामधून तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. मग तिने बॉलिवूडकडे तिचा रस वाढवला. तेव्हा तिला मुंबई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर तिला हॉलीडे हा चित्रपट मिळाला.

२००८ पासून ते आता पर्यंत मुनमुन तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमधून मुनमुन चांगले मानधन मिळते. सोशल मीडिया द्वारे सुद्धा मुनमुन चांगली कमाई करते. मात्र तिला असे आलिशान आयुष्य जगायला आवडते.

नुकताच अभिनेत्रीने मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आहे. त्या फ्लॅटची किंमत लाखोंच्या घरात आहे. याचसोबत तिच्याकडे महागड्या गाड्या देखील आहेत. त्यात २३.३३ लाखांची इनोव्हा क्रिस्टा कारचा समावेश आहे. मुनमुनकडे मारुती स्विफ्ट डिझायर ते टोयोटा इनोव्हा क्रिस्टा पर्यंत गाड्या आहेत.

Leave a Comment