कोण आहेत गोल्डन बॉइज? कुठून आलं त्यांच्याकडे एवढ सोनं, जाणून व्हाल थक्क….

आज लोक प्रसिद्ध मिळवण्यासाठी काही करत असतात. सगळ्यांना मोठमोठ्या लोकांसारखे आयुष्य असावे असे वाटत असते. काही लोक प्रसिद्ध होण्यासाठी अनेक चुकीचे मार्ग वापरताना दिसले आहेत. (big boss wildcard entry Golden Boys, Who are the Golden Boys? Where did they get so much gold?)

समाजामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी गोल्डन मॅन हा ट्रेंड चालू झाला होता. त्यावेळी अनेक तरुण हातात, गळ्यात, मोठं मोठ्या सोन्याच्या चैन घालून समाजातमध्ये वावरत होती. परंतु अशीच दोन तरुण गोल्डन बॉइज म्हणून सर्वत्र ओळखू जाऊ लागली होती. पुण्यातील सनी वाघचौरे आणि बंटी गुजर अशी या गोल्डन बॉइजची नावे आहेत. ते त्यांच्या महागड्या गाडी, अंगावरील सोनं आणि सोन्याच्या मोबाईलसाठी ओळखले जातात.

या जोडीची चर्चा सतत होत असते. परंतु ही जोडी एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे. तर या जोडीची बिग बॉसमध्ये धमाकेदार वाइल्डकार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सर्वत्र यांची चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे कि, इतकं सोनं गळ्यात घालून बिग बॉसमध्ये एन्ट्री करणारे ही पोर कोण आहेत?

तर अनेकांना असा देखील प्रश्न पडला आहे कि, इतक्या कमी वयामध्ये या दोघांकडे इतकी मोठी संपत्ती कुठून आली? इतक्या संपत्तीसोबत त्याच्या कडे प्रचंड महागड्या गाड्या आहेत. त्यामुळे अनेकांना हे प्रश्न पडणं साजिक आहे.

सनी आणि बंटीची चर्चा त्यांच्या अंगावरच्या सोन्यामुळे आणि महागड्या गाड्यांमुळे होत आहे. तर सनीवर त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार, प्राण घटक हल्ला, तसेच दमदाटी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

मात्र सनी आणि बंटी या दोघांकडे एवढी संपत्ती कुठून आपली हे अजून समोर आलं नाही. परंतु सनी आणि बंटी यांची अनेक मोठ्या लोकांसोबत ओळख आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांना प्रोड्युस केलं आहे. तर काही दिवसांपूर्वी हे दोघ द कपिल शर्मा शोमध्ये देखील अनेकांना दिसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या अभिनेता विवेक ओबेरॉय हे या दोघांचे चांगले मित्र आहेत असे देखील त्यांनी सांगितलं होत.

या दोघांकडे खूप संपत्ती आहे. हे दोघे ८ किलो सोनं रोज अंगावर घालत असतात. तसेच त्यांच्या कडे प्रचंड महागड्या गाड्या आहेत. त्यात रेन्ज रोव्हर, जग्वार, ऑडी अश्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच सनी आणि बंटी कडे सोन्याचा मोबाईल आहे. अशी त्यांच्या कडे मालमत्ता आहे.

सनी त्याच्या आलिशान आयुष्यामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. परंतु मध्यंतरी त्याच्यावर त्याच्या पत्नीचा छळ, बेल्टने मारहाण, अशे  गंबीर आरोप त्याच्यावर झाले होते. त्यामुळे तो बदनाम देखील तितकाच झाला होता. याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.

माहितीनुसार सनी भंगाराच्या व्यवसाय करत होता. परंतु सनी आणि बंटीकडे ही संपत्ती कुठून आली आद्यपि याबद्दल काही कळलं नाही. मात्र बिग बॉसमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री झल्यानंतर त्यांना त्यांच्याकडील असणाऱ्या अंगावरच्या सोन्याबद्दल प्रश्न विचरण्यात आला होता. तेव्हा या दोघांनी सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले होते. तर सनी याच्या कडे ५ कोटी पर्यंतच सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment