फू बाई फू कार्यक्रमावर महाराष्ट्राची हास्यजत्राच्या दिग्दर्शकाचा टोला; म्हणाले, नक्कल करण्यापेक्षा…

छोट्या पड्यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला आहे. प्रेक्षक हा कार्यक्रम खूप आवडीने पाहतात. तसेच हा कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेचा विषय ठरत असतो. (Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami Criticizes Fu Bai Fu Program)

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. त्यामुळे लोक हा कार्यक्रम खूप आवडीने बघतात. कार्यक्रमासोबत यातील अनेक कलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाचे सर्व कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या विनोदावर हसायला भाग पडतात.

काही दिवसांपासून हा कार्यक्रम आणि यातील काही कलाकार चर्चेत आले आहेत. आता झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील काही कलाकार  प्रेक्षकांचे मनोरन्ज करताना दिसत आहेत. अलीकडेच या संदर्भात महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून फू बाई फू’ हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरत आहे. हा कार्यक्रम पुन्हा ९ वर्षांनी सुरु झाला आहे. परंतु हा कार्यक्रम लाकरच बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. फू बाई फू हा कार्यक्रम  टीआरपीच्या यादीत स्वतःचे स्थान भकम करू शकत नसल्याने लवकर प्रेक्षकांना रामराम ठोकणार असल्याचे समजले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्राचे  दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना याबद्दल एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी ते म्हणाली कि, “या सगळ्यामध्ये कलाकारांचा काहीही दोष नाही. “कोणत्याही एखाद्या सिस्टीममध्ये गेल्यानंतर स्व:त्व सोडायचं नाही, हे प्रत्येकाने ठरवायला हवं. जर मला उद्या चॅनलने सांगितलं की तुम्ही हवा येऊ द्या सारखा शो करा तर मी त्यांना त्याचवेळी नाही असे सांगेन.”

पुढे ते म्हणाली की, “तो आमच्यातील गुण नाही. मला जे उत्तम करता येते, मला काय पटतं, मला काय सुचतं, जगात काय चाललंय त्याची नक्कल करण्यापेक्षा आम्हाला जे करावंस वाटतं तेच आम्ही करतो. एखाद्या गोष्टीची नक्कल करण्यात आम्हाला काहीही रस नाही.”

याच संदर्भात सचिन गोस्वामी यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी त्यांनी त्या लिहले होते कि, “मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे बगळ्याने उंच भरारी घ्यावी. मोराने बगळ्याचे अनुकरण करू नये, बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये. आपली क्षमता, विशेषता ओळखावी, नैसर्गिकता जपावी. सौंदर्य त्यातच आहे. कलाकृतीचेही असेच असते.”

या पोस्टबद्दल सांगत ते म्हणाली कि, “यातून मला मोर आणि बगळा हे दोन्हीही पक्षी स्वतंत्र वैशिष्ट असलेले पक्षी आहेत. प्रत्येकाचे एक वैशिष्ट आहे. त्याचनुसार मी माझी जी वैशिष्ट्ये आहेत, त्याला जास्तीत जास्त चॅलेंज देतो आणि ते उत्तम करण्याचा प्रयत्न करतो.”

पुढे ते म्हणाले कि, त्यांचे अनेक मित्र चल हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये आहेत. तसेच महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या ऑडिशनमधून जे टॅलेंट एकत्र केल होत. आज तेच लोक प्रसिद्ध चेहरा बनून पुढे आले आहेत. मात्र वाईट वाटते जेव्हा लोक तुलना करतात. असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Leave a Comment