देवमाणूस मालिका फेम ‘बाबू’ जगतो आलिशान आयुष्य; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क…

छोट्या पाड्यावरील अनेक मालिका खूप प्रसिद्ध  झाल्या आहेत. देव माणूस या मालिकेची विशेष चर्चा होता असल्याचे आपल्या दिसत आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. (actor ankush  who played Babu role in Devmanoos serial lives a luxurious life)

देवमाणूस ही मालिका खूपच ट्विस्ट अँड टन्सनी भरलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला खूप प्रेम देताना दिसत होते. मालिकेसोबत मालिकेमधील अनेक पात्र खूप लोकप्रिय झाले आहेत. तर या मालिकेमधील एक पात्र खूप चर्चेत येत आहे. आजी हे पात्र बाकी इतर पात्रांपेक्षा खूप प्रसिद्ध झालं आहे. या पात्राला प्रेक्ष खूप प्रेम देखील देत आहेत. तसेच मालिकेतील अजित कुमार देव, एसीपी दिव्या सिंह, सरकारी वकील आर्या, बजा अशी पात्र सुद्धा प्रसिद्ध झाली आहेत.

अभिनेता किरण गायकवाडने अजित कुमार देव याची भूमिका साकारली आहे. तर या मालिकेत काम करण्याआधी किरण लागीर झालं जी या मालिकेत झळकला होता. परंतु या मालिकेमध्ये तो नकारात्मक भूमिकेत  दिसला होता.  देव माणूस या मालिकेतसुद्धा  किरण नकारात्मक भूमिका साकारत आहे.

ही मराठी मालिका सातारा जिल्ह्यामधील एका गावातील सत्यघटनेवर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी या गावामध्ये संतोष पोळ नावाचा बोगस डॉक्टर आला होता. त्यांनी अनेकांवर उपचार तर केले. परंतु काहीच प्राण देखील घेतले. या घटनेवर देवमाणूस  ही मालिका अवलंबून आहे.

आपण आज या मालिकेतील काही पात्रांबद्दल जाणून घेऊया. बाबू दादा यांनी डिंपलच्या वडिलाची भूमिका साकारली आहे. याच पात्राच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेता अंकुश मांडेकर यांनी बाबू दादा यांची भूमिका साकारली आहे. खूप कष्टाने अंकुश मांडेकर यांनी  हे यश गाठले आहे. बीकॉमची पदवी अंकुश मांडेकर यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी काही काळ पुण्यामध्ये नोकरी केली होती. परंतु त्यांना अभिनय आणि नाटक करण्याची खूप आवड होती.

लहानपणा पासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी लहानपणी भारूडांमध्ये काम केले होते. योगेश सोमण यांच्या सावकाराची जन्मठेप या नाटकामधून त्यांनी अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं होत. या नाटकमध्ये  त्यांनी त्यांच्या अभिनयाची खरी जादू दाखवली. या नाटकनंतर त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला होता.

मला जगायचंय हा चित्रपट अंकुश यांच्या आयुष्यातील पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्यांची एक वेगळी ओळख चित्रपटविश्वामध्ये पडली. त्यानंतर जो त्यांचा प्रवास चालू झाला ते अजून चालूच आहे. त्यांनी एकूण ४७ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सात नाटकांमध्ये देखील त्यांची त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

अंकुश आता झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेमध्ये बाबू दादा नावाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेमधील त्यांचं पात्र सर्वांचं आवडत आहे. त्यांच्या बोलण्याची स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Leave a Comment