मुलगी झाली हो मालिकेतील माऊचा खरा बॉयफ्रेंड आला समोर? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…

छोट्या पाड्यावर अनेक मलिक चालू आहेत. परंतु काही मालिका अश्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात आपण आई कुठे काय करते ,सुख म्हणजे नक्की काय , सह कुटुंब सह परिवार अश्या मालिकांची नावे घेऊ शकतो. या मालिकेंनी अनेकांना वेड लावले आहे. (mulgi zali ho fame actress Divya Subhash Pugavkar boyfriend video gone viral)

मालिकांसोबत यातील अनेक कलाकार खूप प्रसिद्ध झाले आहेत. मात्र टीव्हीवर मुलगी झाली हो ही मालिका प्रचंड गाजत आहे. तसेच या मालिकेला लोक खूप पसंती देत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेमधील अनेक पात्र खूप लोकप्रिय झाले आहे.

शौनकच्या भूमिकेला लोक खूप प्रेमात देत आहेत. तसेच या मालिकेमधील मऊ खूप लोकप्रिय झाली आहे.  माऊचे नाव साजरी असे दाखवले आहे. माऊची लहानपणीची भूमिका  मैथिली पटवर्धन हिने साकारले होते.

मात्र आता मऊ मोठी झाल्याचे या मालिकेमध्ये दाखवले आहे. तर आता मोठ्या माउचं पात्र अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकरने साकारले आहे. तर ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षक मऊमुळे या मालिकेला पाहत असल्याचे समजत आहे.

मुंबईमध्ये 21 जुलै 1996 रोजी दिव्या जन्म झाला आहे. तिने डीव्हीए कॉलेजमधून दुसऱ्या वर्षापर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर अभिनय आणि मॉडेलिंगच्या आवडीमुळे तिने या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

आता दिव्या २४ वर्षांची आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेमध्ये सुद्धा ही अभिनेत्री आपल्यला दिसली होती. या मालिकेमधील तिची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे तिच्या बद्दल जोरदार चर्चा होत आहेत.

या व्हिडिओमध्ये ती एका कारमध्ये आहे. तर एक तरुण कार चालवत आहेत. त्याला बघून दिव्या तू ही मेरी जिंदगी हमेशा हे गाणं म्हणत आहे. ज्यावरून असे समजत आहे कि, हा तरुण दिव्यासाठी खास व्यक्ती आहे. अनेक जण तो तरुण तिचा बॉयफ्रेंड असल्याचे देखील सांगत आहेत.

परंतु याबद्दल आणखीन दिव्याने काहीच स्पष्ट केलं नाही. अक्षय घरात असे या तरुणाचे नाव आहे. हा एक फिटनेस मॉडेल आहे. त्याने अनेक मॉडेलिंग शो आणि जाहिराती मध्ये काम केलं आहे. हे दोघे प्रियकर-प्रेयसी आहेत का? असे प्रश्न माऊच्या चाहत्यांना पडले आहेत. मात्र अद्यापि दिव्याने यावरच काहीच स्पष्ट कल नाही.

Leave a Comment